Royal Entertainmentमुख्य बातम्या

कुटुंबियांनीच केले अर्धमेला

0

मुंबई – ‘मेला’ चित्रपटात आमिर खान याच्यासह त्याचा भाऊ फैजल हा देखील मुख्य भूमिकेत होता. मात्र, या चित्रपटानंतर मला माझ्याच कुटुंबाने एक वर्ष घरातच डांबून ठेवले व सातत्याने औषधे घ्यायला लावली, त्यामुळे एकवेळ अर्धमेला झाल्यासारखी अवस्था झाली होती, अशा शब्दांत फैजलने आपल्याच कुटुंबियांवर आरोप केले आहेत.
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर घराणेशाही, नैराश्‍य तसेच अन्यायाबाबत सातत्याने चर्चिले जात आहे. त्यातच आता फैजलनेही तोंड उघडले आहे. निर्माता दिग्दर्शक करण जोहरने आमिर खानचा भाऊ असूनही एका पार्टीत आपला सर्वांसमक्ष अपमानही केला होता. त्यानंतर मला कोणत्याही पार्टीत जाण्याची इच्छाच होत नव्हती. घरातही मला निऱाशाजनक वातावरणाचा सामना करावा लागला. या काळात मला मानसिक त्रास असल्याचे माझ्याच कुटुंबाने जाहीर केले होते. इतकेच नाही तर जवळपास एक वर्ष जबरदस्तीने मला वेगवेगळी औषधे घ्यायला लावली, असेही त्याने सांगितले.
2000 साली मेला चित्रपटात भूमिका केली, संपूर्ण चित्रपट योग्य पद्धतीने हाताळला. तरीही मला स्किझोफ्रेनिया झाल्याचे माझ्याच कुटुंबाने सातत्याने माध्यमांना सांगितल्याने त्यावेळी मी खूप निराश झालो होतो. अखेर मी याला कंटाळून घर सोडले व कुटुंबाविरुद्ध केसही केली. ही केस जिंकून मी मानसिकदृष्ट्या अत्यंत फिट असल्याचेही सिद्ध केले, असेही तो म्हणाला.
आमिरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत करण जोहरसह अन्य काही बड्या व्यक्तींनी अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली. त्यानंतरही मी अनेक निर्मात्यांना भेटलो पण केवळ कार्यालयाबाहेर बसवून ठेवण्यात येत होते. ‘मेला’नंतर मला एकाही बड्या निर्मात्याने चित्रपटाची ऑफर दिली नाही. त्यामुळेही मी खूप निराश झालो होतो. मात्र, आता मी यातून बाहेर आलो आहे, असेही त्याने सांगितले.
The post कुटुंबियांनीच केले अर्धमेला appeared first on Dainik Prabhat.

चाहत्याने सिमकार्डवर रेखाटला सोनू सूदचा फोटो; सोनूने दिला ‘भन्नाट’ रिप्लाय

Previous article

चाहत्याने सिमकार्डवर रेखाटला सोनू सूदचा फोटो; सोनूने दिला ‘भन्नाट’ रिप्लाय

Next article

You may also like

Comments

Comments are closed.