मुख्य बातम्या

योगी आदित्यनाथांच्या ‘या’ निर्णयावर फडणवीस खुश ; जय जिजाऊ जय शिवरायचा केला जयघोष !

0

आग्रा येथे होत असलेल्या संग्रहालयाला मुघलांचे नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिले जाणार आहे, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केल्यानंतर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच त्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ट्विटरच्या माध्यमातून फडणवीस यांनी योगी सरकारच्या निर्णयाची स्तुती केली आहे.

आगरा में निर्माणाधीन म्यूजियम को छत्रपति शिवाजी महाराज के नाम से जाना जाएगा।
आपके नए उत्तर प्रदेश में गुलामी की मानसिकता के प्रतीक चिन्हों का कोई स्थान नहीं।
हम सबके नायक शिवाजी महाराज हैं।
जय हिन्द, जय भारत।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) September 14, 2020

Loading...

आग्रा येथे ‘ ताज महल ‘च्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ भव्य असं मुघल संग्रहालय उभारण्यात येत आहे. १५० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या संग्रहायलाचे काम सध्या वेगात सुरू आहे. या संग्रहालयाबाबत उत्तर प्रदेश सरकारने आज महत्त्वाचा आणि शिवरायांचा गौरव वाढवणारा निर्णय घेतला. हे संग्रहालय मुघलांच्या नावाने नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. ‘

।। जय जिजाऊ, जय शिवराय ।।छत्रपती शिवाजी महाराज की जय !Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai ! https://t.co/Ro8sA00eOa
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 14, 2020

योगी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव वाढवणारा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच या निर्णयाचे स्वागत केले. फडणवीस यांनी योगींचं ट्विट रीट्विट करत शिवरायांचा जयजयकार केला. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’, असं ट्विट करत फडणवीस यांनी योगी सरकारचं कौतुक केलं.
महत्वाच्या बातम्या :-

कंगना सोडून आता कोरोनाकडे लक्ष द्या ; फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला
फडणवीस मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांचा एकेरी उल्लेख खपवून घेतला नसता : जयंत पाटील
शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !
नाथाभाऊ तुमच्याकडचे ते व्हिडिओ व फोटो जनतेसमोर आणावेत – सचिन सावंत
रोहित पवारांना कॅलक्युलेशन जमत नाही अभ्यास करुन बोलावं ; फडणवीसांचा टोला

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. योगी आदित्यनाथांच्या ‘या’ निर्णयावर फडणवीस खुश ; जय जिजाऊ जय शिवरायचा केला जयघोष ! InShorts Marathi.

Loading...

नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा ; गुलाबराव पाटलांचे एकनाथ खडसेंना आवाहन

Previous article

मोदी सरकारचा मोठा निर्णय ; खासदारांच्या पगारात होणार ३० टक्के कपात !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.