मुख्य बातम्या

फडणवीसांनी राज्यपालपदाची ऑफर दिली होती ; खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

0

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती. त्यांनी त्यांच्या कन्येची शपथ घेऊन मला राज्यपाल करणार असल्याचं सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
मी विधानसभेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मला त्यांच्या अँटिचेंबरमध्ये बोलावलं होतं. त्यावेळी त्यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती. त्यावेळी मला काही राज्यपालपदाची इच्छा नाही असं मी त्यांना सांगितलं. तेव्हा मुलीची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला राज्यपाल करणार आहोत आणि पक्षश्रेष्ठीची त्याला संमती असल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं, असं खडसे यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल पद मिळाले नाही. त्यानंतर फडणवीस यांनी मला पुन्हा राज्यसभेत पाठवणार असल्याचं सांगितलं. राज्यातून राज्यसभेसाठी कुणीही जाणार नाही. फक्त तुमचंच नाव पाठवणार आहोत आणि तुमचं नाव पाठवण्यास पक्षश्रेष्ठींची काहीच हरकत नसल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं होतं. पण नंतर चार दुसरीच नावं आली, असंही त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :-

पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर अन् पाकिस्तानसोबत टक्केवारी? भाजपचा सेनेवर हल्ला
कंगना सोडून आता कोरोनाकडे लक्ष द्या ; फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला
संजय राऊतांनी मला उघड धमकी दिलीय ; कंगनाचा गंभीर आरोप
सूड बुद्धीने ठाकरे सरकार कंगनावर कारवाई करत आहे का ?
धनंजय मुंडेंनी घेतला कंगनाच्या वक्तव्याचा समाचार , म्हणतात..

 
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. फडणवीसांनी राज्यपालपदाची ऑफर दिली होती ; खडसेंचा मोठा गौप्यस्फोट InShorts Marathi.

राज्यातील ‘या’ भागात जोरदार पावसाची हजेरी

Previous article

महाराष्ट्रातल्या श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नकोय ; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

Next article

You may also like

Comments

Comments are closed.