Royal politicsटॉप पोस्ट

फेसबूक प्राइवेसी सेटिंगवर ‘बग’चा हल्ला; 14 मिलियन युजर्सवर परिणाम

0

फेसबूकवरील प्राइवेसी सेटिंगमधील फ्रेंड्स ओन्ली किंवा फक्त प्राइवेट पोस्ट सेण्ड करण्याच्या फेसबूक सेटिंगवर ‘बग’ सॉफ्टवेअरचा सायबर हल्ला झाला असल्याचे फेसबूक कडून सांगण्यात आले.

फेसबूक सेटिंगवर झालेल्या या हल्ल्यामुळे  ‘फ्रेंड्स ओन्ली’ ही सेटिंग असलेल्या यूजर्सकडून सेण्ड करण्यात आलेल्या पोस्ट पब्लिक  झाल्याचे फेसबूक ने संगितले. या मध्ये 14 मिलियन युजर्स च्या पोस्ट वर ‘बग’ सॉफ्टवेअरचा परिणाम झाल्याचे समोर आले आहे. 18 मे ते 27 मे या काळात ‘बग’ सॉफ्टवेअरचा सायबर हल्ला झाल्याने  प्राइवेट पोस्ट आपोआप पब्लिक झाल्या आहेत.

Loading...

ज्या युजर्स ने ‘फ्रेंड्स ओन्ली’ किंवा काही प्राइवेट सेटिंग केली होती त्यांना देखील बग सॉफ्टवेअर आपोआप ‘न्यू पोस्ट पब्लिक करा’ असे चिन्हांकृत करीत होते. ज्यांनी या नवीन डीफॉल्ट सूचनेकडे दुर्लक्ष केले, त्यांच्या पोस्ट अनपेक्षितरित्या पब्लिक झाल्या. बग चा कोणत्याही  जुन्या पोस्ट वर    परिणाम झाला नसून,  बग अॅक्टिव असताना ज्या युजर्स च्या पोस्ट वर याचा परिणाम झाला अशा युजर्सला फेसबूककडून सूचित करून त्यांना त्यांच्या पोस्ट पुन्हा रिव्हीव करण्यास सांगण्यात आले असे फेसबूक चे प्रमुख प्रयवेसी ऑफिसर ईगण यांच्याकडून सांगण्यात आले.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार फेसबूक ने हूआवेई, ओप्पो, लेनेवो आणि अन्य काही चीनी कंपंनींना फेसबूक युजर्स चा डाटा वापरण्याची परवानगी दिली होती, या अंतर्गत या कंपन्या काही युजर्स च्या माहिती पर्यंत पोहचू शकतात. हे निर्णय 2010 च्या पूर्वीचे आहेत, परंतु हूआवेई बरोबरचा हा करार या आठवड्यात संपेल असे फेसबूक कडून सांगण्यात आले.

भारत सरकारच्या सूचना प्रद्योगिकी मंत्रालयाने या परिणामांचा विचार करीत मोबाइल युजर्स ची चीनी कंपन्यांना देण्यात येणार्‍या महितीबदल फेसबूककडून रिपोर्ट मागवण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी फेसबूक ; कैब्रिज अनालिटिका या लिक झालेल्या डाटा प्रकरणामुळे चर्चेत होते.

(PHOTO INPUT- FACEBOOK)

Loading...

मी माझी राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना मांडत आहे :- प्रणब मुखर्जी

Previous article

गेल्या 2 वर्षा पासून शेतकरी आत्महत्या संबंधित अहवालाचे प्रकाशनच नाही; सरकार उदासीन?

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *