Royal Entertainmentमुख्य बातम्या

भाजप आमदार राजा सिंहवर फेसबुकची कारवाई

0

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि काही फेसबुक अकाऊंटवर कारवाई करण्यास फेसबुक हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याच्या वृत्तानंतर भारताच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली होती.
जुलै महिन्यात अमेरिकेतील ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने याविषयीचा वृत्तांत प्रसिद्ध केल्यानंतर फेसबुक व भाजपाची मिलीभगत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता. यासंदर्भात मार्क झुकेरबर्गला विचारणाही करण्यात आली होती. त्यानंतर आता फेसबुककडून भाजपाच्या आमदारावर कारवाई करण्यात आली आहे.
भाजपा नेत्याच्या द्वेषयुक्त भाषणावरून ‘फेसबुक’ने हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केल्यानंतर देशात राजकीय वादंग निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर फेसबुकने ज्या भाजपा आमदाराच्या पोस्टवरून वादाला तोंड फुटलं, त्यांच्यावर कारवाई केली आहे. तेलंगणाचे भाजपा आमदार राजा सिंह यांच्यावर फेसबुककडून कारवाई करण्यात आली आहे. राजा सिंह यांच फेसबुक अकाउंटही बंद करण्यात आले आहे.
द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्टमुळे फेसबुकच्या धोरणाचे उल्लंघन केल्याबद्दल भाजपा नेत्यावर बंदी घालण्यात आली, अशी माहिती फेसबुकच्या प्रवक्‍त्याने दिली. बुधवारी कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीसमोर फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी त्यांची बाजू मांडली. विरोधकांच्या वाढत्या राजकीय दबावानंतर राजा सिंह यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
The post भाजप आमदार राजा सिंहवर फेसबुकची कारवाई appeared first on Dainik Prabhat.

हॅपिएस्ट माईंडस्‌चा आयपीओ सोमवारपासून खुला होणार

Previous article

फेसबुक पूर्णपणे निःपक्षपाती

Next article

You may also like

Comments

Comments are closed.