मुख्य बातम्या

अखेर शिव-शंभूप्रेमींच्या लढ्याला यश ; संभाजी बिडीचं नाव बदलण्याचा कंपनीचा मोठा निर्णय

0

संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा साबळे वाघिरे आणि कंपनीचा निर्णय..मात्र त्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचे कंपनीने सांगितले.
संभाजी बिडीचे नाव बदलावे या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून संभाजी ब्रिगेड आणि काही राजकीय संघटनांनी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला आंदोलन सुरू केले होते. त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून संभाजी ब्रिगेड नाव बदलण्याचा निर्णय साबळे वाघिरे आणि कंपनीने घेतला आहे..
हे नाव बदलण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागेल असे साबळे वाघिरे आणि कंपनीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे..कंपनी आपल्या उत्पादनासाठी नवीन नाव कायदेशीर रजिस्टर करणार आहे. जेणेकरून हे नवीन नाव आम्हाला आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल. त्यामुळे आमचा ग्राहकांची साखळी तुटणार नाही. शिवप्रेमींची मागणीही पूर्ण होईल आणि 60 ते 70 हजार विडी कामगारांच्या प्रपंचावर ही कुऱ्हाड येणार नाही, असे कंपनीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
संभाजी ब्रिगेड, शिवधर्म फाउंडेशन व इतर शिवप्रेमी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जनभावनेचा आदर करून आम्ही विडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे साबळे वाघेरे आणि कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले.
महत्वाच्या बातम्या :-
पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांचे पंचनामे करुन तातडीने मदत द्या ; फडणवीसांची सरकारकडे मागणी
आर आर पाटलांच्या घरात कोरोनाचा शिरकाव ; भावासह मुलाला कोरोनाची बाधा
“तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते, राज्यातील पोलीस भांडी घासायच्या लायकीचे आहेत ! “
गणेश विसर्जन सोहळ्यानंतर पुणे पोलीसांनी मानले पुणेकरांचे आभार
कौतुकास्पद काम ; मुंबईच्या डबेवाल्यांसाठी धावून आले रोहित पवार !
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. अखेर शिव-शंभूप्रेमींच्या लढ्याला यश ; संभाजी बिडीचं नाव बदलण्याचा कंपनीचा मोठा निर्णय InShorts Marathi.

फडणवीस मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांचा एकेरी उल्लेख खपवून घेतला नसता : जयंत पाटील

Previous article

उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख पडला महागात ; अब्रूनुकसानीचा कंगनाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.