मुख्य बातम्या

लॉकडाऊनच्या काळात देऊळ बंद ; तरीही साईबाबांच्या झोळीत तब्बल 21 कोटी रुपयांचे दान

0

कोरोनाच्या दुष्टचक्रात बाजारपेठा बंद राहिल्या, मंदिरे भक्तांविना ओस पडली. मात्र शिर्डीमध्ये साईबाबा समाधी मंदिराकडे येणारा देणगीचा ओघ सुरूच आहे. यंदा लॉकडाऊनच्या काळात १७ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत साई संस्थानला साईभक्तांकडून विविध माध्यमांतून २० कोटी ७६ लाख ५४ हजार १५१ रुपये देणगी प्राप्‍त झाली.
गेल्या वर्षी प्राप्त देणगीचा विचार करता ही रक्कम अत्यल्प आहे. गतवर्षी याच कालावधीत तब्बल २०३ कोटी ३७ लाख ७१,७९५ रुपये देणगी मिळाली होती. म्हणजेच यंदा देणगीमध्ये १८२ कोटी ६१ लाख १७,६४४ रुपये इतकी घट झाली.
कोरोनाचा संसर्ग देशात सुरू झाल्यानंतर या महामारीला अटकाव करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रतिबंधात्मक उपाय सुरू करण्यात आले. यात राज्य व केंद्र सरकारच्या दिशानिर्देशांनुसार टप्पेवार लॉकडाऊन सुरू झाले. याच दरम्यान शिर्डी संस्थानने १७ मार्चपासून साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले. दक्षिणापेटीत येणारी देणगी रक्कम मिळालीच नाही.
महत्वाच्या बातम्या :-
फडणवीस मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांचा एकेरी उल्लेख खपवून घेतला नसता : जयंत पाटील
दहा-पंधरा वर्षांपूर्वी वर आलेले आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत ; खडसेंचा फडणविसांवर हल्ला
मोदींना जाब विचारण्याची हिंमत आहे का? मुख्यमंत्र्यांचा भाजपला खडा सवाल
राज्यातील मंदिरे उघडण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात…
पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांचे पंचनामे करुन तातडीने मदत द्या ; फडणवीसांची सरकारकडे मागणी
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. लॉकडाऊनच्या काळात देऊळ बंद ; तरीही साईबाबांच्या झोळीत तब्बल 21 कोटी रुपयांचे दान InShorts Marathi.

मला उध्वस्त करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले ; एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

Previous article

चिंताजनक : महाराष्ट्रात दर तासाला होतेय 1000 नव्या कोरोनाच्या रुग्णांची भर !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.