मुख्य बातम्या

“बाप मुख्यमंत्री आणि स्वतः कॅबिनेट मंत्री असूनसुद्धा कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात चालले आहेत”

0

ठाकरे सरकारमधील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाट धरली आहे. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांनी मनसेमध्ये प्रवेश केला. यामुळे खुद्द शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मनसे प्रवेश केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

वरळी मतदारसंघातले शेकडो शिवसैनिक दुसऱ्या पक्षात गेले. बाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री, मतदारसंघात 2 माजी आमदार तरीही मोठ्या प्रमाणात लोक शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात चालले आहेत. मुंबईच्या वरळी मतदार संघात सामान्य लोकं स्थानिक आमदाराच्या नावाने शिव्या घालत आहेत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 19, 2020

भाजप नेते निलेश राणे यांनी देखील ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ” वरळी मतदारसंघातले शेकडो शिवसैनिक दुसऱ्या पक्षात गेले. बाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री, मतदारसंघात 2 माजी आमदार तरीही मोठ्या प्रमाणात लोक शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात चालले आहेत. मुंबईच्या वरळी मतदार संघात सामान्य लोकं स्थानिक आमदाराच्या नावाने शिव्या घालत आहेत.” असा घणाघात निलेश राणेंनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-

कंगना द्रौपदी तर उद्धव ठाकरे दुःशासन ; शहरात लागलेल्या पोस्टरवरून राजकीय महाभारत पेटले !
ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आता कंगनाचीही चौकशी होणार ; गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना कडक आदेश
पुण्यात मास्क न घालणाऱ्यांकडून वसूल केला तब्बल 25 लाख रुपयांचा दंड
मुंबईत येत्या काही आठवड्यांमध्ये भयंकर पसरेल कोरोना !
दारुप्रमाणे मंदिरातून महसूल मिळाला असता तर मंदिरं उघडली असती ; भाजपचा आरोप

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. “बाप मुख्यमंत्री आणि स्वतः कॅबिनेट मंत्री असूनसुद्धा कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात चालले आहेत” InShorts Marathi.

…तर मी ट्विटर कायमचं सोडेन ; कंगनाचं विरोधकांना नवं आव्हान

Previous article

मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या ढोंगीपणाचा गाळ दिसला ; ठाकरे सरकारच्या कारभारावरून भाजपाची टीका

Next article

You may also like

Comments

Comments are closed.