Royal Entertainmentटॉप पोस्ट

Loveratri Trailer :- 9 दिवस 9 रात्रीची लवस्टोरी ठरेल का बॉक्स ऑफिसवर सुपरहिट

0

सलमान खान skf या फिल्म प्रोडक्टशनच्या रेस 3 नंतर पुन्हा एकदा एक नवी फिल्म घेईन येतोय, ‘लवरात्री’..ते ही नव्या कलाकारांना घेऊन..लवरात्री या बॉलीवूड फिल्मचा ट्रेलर आज लॉच करण्यात आला आहे. यात आयुष्य शर्मा आणि वरीना हुसैन लीड रोलमध्ये आहेत.

फिल्मचा ट्रेलर बघून तीच तीच बॉलीवूड स्टोरी पुन्हा पुन्हा रिपीट होते असे वाटायला लागते. या फिल्मचा प्लॉट नवरात्री हा तरुणांचा आवडीचा सण घेण्यात आला आहे. ज्यात नेहमी सारख दांडिया खेळताना एक मुलगा, दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडतो. अशी घिसीपीटी कहाणी असल्यासारख प्रथमदर्शी ट्रेलर मधून दिसत आहे. श्रीमंत बापाची पोर, गरीब घराचं पोरग, शाकाल बाप आणि त्यात त्या दोघांच्या प्रेमाची घालमेल… तोच बॉलीवूड मसाला आणि तडका.

Loading...

लॉच करण्यात आलेल्या ट्रेलर नुसार हिरो – हिरॉईनची लवस्टोरी भारतात सुरू होते आणि परदेशात जाऊन संपते. या फिल्ममध्ये सोहेल आणि अरबाज खान दोघेही असणार आहेत. तर रोनित रॉय हा हिरॉईनचा श्रीमंत बाप दाखवला आहे आणि राम कपूर हीरोचा गरीब बाप दाखवला आहे.

ट्रेलर पाहून ही फिल्म ‘9 दिवस 9 रात्री’ यात कशी लव स्टोरी घडते हे दाखवले आहे असे दिसते. फिल्म बॉक्स ऑफिस वर किती सुपरहिट ठरते हे सांगण आता अवघड असल तरी यातील गाणी आणि त्याला दिलेलं संगीत प्रेक्षकांच्या पसंतीला नक्कीच उतरेल अस दिसतंय.

‘लवरात्री’च प्रोडकशन ‘सलमान खान’च असून, डायरेक्टर अभिराज मिनावाला आहे. ही फिल्म 2 महिन्यानंतर 5 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

सलमान खान ने पुन्हा एकदा नव्या चेहऱ्यांना घेऊन आपली फिल्म आणली आहे. याचा ट्रेलर 10 शहरांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. फिल्म चा ट्रेलर धूमधडाक्यात रिलीज करण्यात येतोय.

 

हे ही वाचा-

वाढदिवसाच्या दिवशी भारतीय फुटबाॅल कॅप्टन सुनिल छेत्रीला मिळाले खास गिफ्ट

 

Loading...

156 वर्ष जुन्या या रेल्वे स्टेशनचे नाव बदलले, आता या नावाने ओळखले जाणार

Previous article

जम्मू-काश्मीरच्या लोकांना विशेष दर्जा देणारे आर्टिकल 35 A नक्की आहे तरी काय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *