Royal Entertainmentटॉप पोस्ट

बाहुबली पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पण थेटरमध्ये नाही तर येथे; जाणून घ्या

0

भारताच्या सिनेमाच्या जगतात आपली खणखणीत ओळख निर्माण करणार्‍या बाहुबली या सिनेमाची आणखी एक नवी कथा दिग्दर्शक राजामौली घेऊन येणार आहेत. आणि ही नवी कथा पुन्हा त्याच थरारासह प्रेक्षणाच्या पसंतीला उतरण्यासाठी जोमाने तयार आहे. परंतू ही कथा काही थेटरमध्ये जाऊन बघण्याची आता गरज नाही. कारण ही बाहुबलीची नवी कथा तरुणांना वेड लावलेल्या नेटफ्लिक्स वर रेलीज होणार आहे.

सध्या तरुणांमद्धे वेबसिरिज चे अत्यंत वेड आहे. यूट्यूब, नेटफ्लिक्स वर आता अनेक वेबसिरिज रिलीज होत धुमाकूळ घालत आहे. याच कल्पनेवर आधारित आपली वेगळी ओळख असलेले प्रसिद्ध दिग्दर्शक राजमौली याची बाहुबली वर आधारित नवी वेब सिरिज नेटफ्लिक्स वर उपलब्ध होणार आहे.

आता ही वेबसिरिज नक्की कश्यावर आधारित असणार असा प्रश्न पडले साहजिक आहे. तो तुम्हाला ही पडला असेल. कारण सिनेमा जगतात धुमाकूळ घातलेला ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लूजन’ या अवाढव्य सिनेमा नंतर आता नवीन काय असा प्रश्न सगळ्यांना पडणे साहजिक. पण राजामौली यांनी तीही शंका दूर केली आहे. 
Loading...

बाहुबलीची कथा आपण सगळ्यांनी पहिली पण बाहुबली मध्ये दाखवलेली त्यांनी शूर, चाणाक्ष आई ची नक्की कहाणी काय? ती पूर्वी कोणाची राजकन्या होती, ती कोणत्या राज्याची होती. ती माहेष्मती राज्याची राणी कशी झाली… हा संपूर्ण जीवन क्रम आता नेटफ्लिक्स वर आता लवकरच पाहायला मिळणार आहे. बाहुबली : द बिगनिंग च्या आधीची कहाणी नक्की काय होती ते आता ‘द राइज ऑफ शिवगामी’ या कथेमद्धे पाहायला मिळेल.  ‘द राइज ऑफ शिवगामी’ या कादंबरीवर ही कथा आधारित असून  नेटफ्लिक्सवर या सिरिजची घोषणा करण्यात आली आहे. या वेबसिरिजचे बाहुबली: बिफोर द बिगनिंग हे नाव असणार आहे. 

एका विद्रोही कन्येपासून ते एक विशाल राज्याच्या शूर राणी पर्यंतचा प्रवास या कथेत दाखवण्यात येणार आहे. त्यासाठी दिग्दर्शक राजामौली यांनी हे बलाढ्य साम्राज्य नेटफ्लिक्स वर आणण्याची तयारी केली आहे. राजमौली यांनी  नेटफ्लिक्स आणि आर्का मीडिया वर्क्सशी करार  केला आहे. परंतू  या नव्याकोर्‍या वेबसिरीजमध्ये कलाकार म्हणून कोण कोण, काय काय भूमिकेत असणार, याबाबत सध्या गुप्तता बाळगण्यात आली आहे.. 

आता हे पाहणे गरजेचे ठरेल की, बाहुबली सिनेमाच्या बलाढ्य यशानंतर ही नवी वेबसिरिज प्रेक्षकांच्या किती पसंतीला उतरते..

Loading...

Pushpak Viman Marathi Movie Review:- सुपर कडक ‘पुष्पक विमान’

Previous article

तुमच्या मोबाइल मध्ये झालाय का आधारचा टोल-फ्री नंबर सेव्ह? हा नंबर आहे खोटा; जाणून घ्या सत्य

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *