खेळटॉप पोस्ट

FIFA WC 2018 : इंग्लंडची पनामावर 6-1 ने मात, हॅरी केनची हॅट्रिक, इंग्लंड अंतिम-16 मध्ये

0

21 व्या फिफा वर्ल्ड कपमध्ये जी ग्रुपमधील आजच्या मॅचमध्ये इंग्लंडने आपल्या दुसऱ्या मॅचमध्ये पनामाचा 6-1 असा पराभव केला.

सामना सुरू होताच  इंग्लंडच्या जाॅन स्टोंसने  8 व्या मिनिटाला गोल करत इंग्लडचे खाते उघडले. संपुर्ण मॅचमध्ये इंग्लंडचेच वर्चस्व होते.पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या पनामाच्या खेळामध्ये अनुभवहिनता सहज दिसुन येत होती.

Loading...

22 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर हॅरा केनने गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यांनंतर 36 व्या मिनिटाला  जेसी लिंगार्डने आणखी एक गोल केला.

इंग्लंडचा आक्रमक खेळ सुरूच होता. 40 व्या मिनिटाला जाॅन स्टोंसने आणखी एक गोल करत 4-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यांनंतर 45 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर हॅरी केनने आणखी एक गोल करत संघाला 5-0 ने आघाडी मिळवून दिली.

इंग्लंडने पहिल्या हाफमध्ये तब्बल 5 गोल केले तर पनामाला एकही गोल करता आला नाही.

मध्यतंरा नंतर हॅरी केनने 62 व्या मिनिटाला हॅट्रिक गोल करत संघाला 6-0 अशी आघाडी मिळवून दिली. पनामातर्फे एकमात्र गोल फेलिप बाॅलयने 78 व्या मिनिटाला केला.

या विजयाबरोबरच इंग्लंडने अंतिम 16 मधील आपली दावेदारी निश्चित केली असून पनामा स्पर्धेतून बाहेर पडली आहे. या आधी इंग्लंडने ट्युनिशियाचा 2-1 असा तर बेल्जियमने पनामाचा 3-0 असा पराभव केला होता.

या बरोबरच जी ग्रुपमधून बेल्जियमचे देखील अंतिम-16 मधील स्थान पक्के झाले आहे.

 

Loading...

Hockey Champions Trophy 2018: ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाचा भारताने केला 2-1 ने पराभव

Previous article

FIFA WC 2018 : कोलंबियाची पोलंडवर 3-0 ने मात, तर जापान-सेनेगल मॅच ड्राॅ

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ