मुख्य बातम्या

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा एल्गार ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन

0

एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धनगर समाजानं शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडाऱ्याची उधळण करत आंदोलनाचं रणशिंग फुंकलं आहे. राज्यभरात धनगर समाजाचा एल्गार पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ सरकार जगाओ’ अशा घोषणा देत आंदोलन केले जात आहे.
सोलापूर जिल्ह्यात ढोल बजाव आंदोलन करण्यात येत आहे. धनगरी ढोल वाजवत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. माळशिरस येथे सकाळी धनगर समाज बांधवांनी सरकारच्या विरोधात ढोल वाजवत आणि भंडाऱ्याची उधळण करत आंदोलनाला सुरूवात केली आहे. त्याप्रमाणे पंढरपुरात देखील धनगर समाज बांधवांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी आज आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरमध्ये ‘ढोल बजाव सरकार जगाओ आंदोलन’ होत आहे. सोलापूर  जिल्ह्यातील विविध भागातून धनगर समाजाचे बांधव ढोल वाजवत आंदोलन स्थळाकडे येऊ लागले आहेत. भंडाऱ्याची उधळण करत आणि धनगरी नृत्य करत सर्व धनगर बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-

बिहारचे डीजीपी भाजपाच्या नेत्यासारखे बोलायचे ; गृहमंत्र्यांची खोचक टीका

अजितदादांच्या कामाचा पुन्हा भल्या पहाटे दणका ; मेट्रो अधिकाऱ्यांची तारांबळ

काश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा ; शिवसेनेची भाजपवर टीका
पुण्यात रात्री 7 नंतरही मिळणार हॉटेलमधले जेवण ; आला ‘हा’ नवीन नियम
1 ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश महागणार ; टोलच्या दरात वाढ

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा एल्गार ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन InShorts Marathi.

चिंतेत वाढ : गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे १९,१६४ रुग्ण वाढले

Previous article

आता पुण्यातील कोरोनाचा भार हिरकणींच्या खांद्यावर !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.