Royal Entertainmentमुख्य बातम्या

करोना काळात पक्षांचा आवाज झाला अधिक मधुर

0

सॅन फ्रान्सिस्को –  गेल्या ८ महिन्यांच्या काळात करोनाच्या महामारीने साऱ्या जगाचे व्यवहार ठप्प केले असले तरी जीवसृष्टीतील प्राणी आणि पक्षी याना मात्र लाभ झाला आहे करोना काळात लॉक डाऊन अपरिहार्य असल्याने माणसांचे दैनंदिन व्यवहार थंडावले असले तरी याच काळात पक्षांचा आवाज आणि किलबिलाट मात्र अधिक मधुर झाला आहे.
सायन्स मासिकात याबाबतच्या संशोधनाचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहेत नर पक्षी मादी पक्षाला आकर्षित करण्यासाठी जे कूजन करतो किंवा गाणे गातो ते गेल्या ८ महिन्यांच्या काळात अधिक मधुर आणि आकर्षक झाले असल्याचे या संशोधनात म्हटले आहे
लॉक डाऊन काळातील मानवी वर्तणुकीचा पक्षांवर कसा प्रभाव पडतो याचा शोध करण्यासाठी हा
अभ्यास करण्यात आला होता या काळात पक्षी अधिक हळुवारपणे गायला शिकलेच शिवाय त्यांच्या
आवाजाची रेंजसुद्धा वाढल्याचे समोर आले नर पक्षांचा आवाज आता जास्त अंतरापर्यंत ऐकू येऊ
लागला आहे
या संशोधनात एक भीती मात्र व्यक्त करण्यात अली आहे ती म्हणजे लॉकडाऊनमुळे उंदीर आणि घुशी
अधिक आक्रमक होऊ शकतात
The post करोना काळात पक्षांचा आवाज झाला अधिक मधुर appeared first on Dainik Prabhat.

व्हिडीओ काॅन्फरन्सिंग अ‍ॅप ‘गूगल मीट’ संदर्भात गूगलचा मोठा निर्णय

Previous article

6 भारतीय क्रिकेटर ज्यांच्या बायका आहेत त्यांच्यापेक्षाही अधिक जास्त श्रीमंत …

Next article

You may also like

Comments

Comments are closed.