Royal politicsटॉप पोस्ट

एका ट्विटमुळे रोखली गेली 26 मुलींची तस्करी, ‘सोशल मीडिया’चा सजग वापर

0

सध्या सोशल मीडियावर अफवाणा चेव फुटलेला असताना अनेक जन जमावकडून मारहाण झाल्याने त्यात भरडले जात आहेत. अशा घटना रोज समोर येत असताना सोशल मीडिया चा तितकाच चांगला वापर करता येतो आणि लोकांचा जीव देखील वाचवता येतो हे काल एका रेल्वे मध्ये दिसून आले.

सोशल मीडियाचा सध्या नुसताचा आलेले एसएमएस फॉरवर्ड करण्यासाठी केला जात असताना काल एका व्यक्तीने सजगता दाखवून चक्क एक दोघांना नाही तर तब्बल 26 व्यक्तींना पुन्हा मानवी हक्क मिळवून दिला. हो, ही घटना सत्य आहेत. अफवा नाही. या व्यक्तीच्या एका ट्विटने तब्बल 26 मुलींना  दोघा मानवी तस्करी करणार्‍या तसकर्‍यांकडून सोडविले.

Loading...

मुजफफरपूर- वांद्रे अवध या एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली, 55 आणि 22 वर्षीय 2 व्यक्ती या मुलींना घेऊन प्रवास करीत होत्या. यातील काही मुली रडत होत्या तर काही अस्वस्थ दिसत होत्या. हे पाहून याच एक्सप्रेसमधून प्रवास करणार्‍या व्यक्तीला ही घटना संशयास्पद वाटली, यामुळे या प्रवाशाने ही माहीत रेल्वे मंत्रालयाला ट्विट केली. याची माहिती मिळताच रेल्वे मंत्रालय सजग झाले. आणि लखनौ वारणासीतील संपर्क साधून अर्धातासात ही यंत्रणा कामाला लागली. ‘चाइल्डलाइन’शी संपर्क साधून रेल्वे सुरक्षा दलाचे काही जवान सध्या वेशात त्या डब्यात पोहचले आणि या पथकाने तसकरी करण्यात येत असलेल्या मुलींची सुटका केली. आणि त्यांना बालकल्याण समितीच्या स्वाधीन केले. आणि दोघा संशयितांना ताब्यात घेतले.

या मुलींना ते दोघे आगरा येथे नेत होते, या मुलींचे वय 10 ते 14 वर्ष दरम्यान आहे. आणि या बिहार (चंपारण) येथील आहेत. त्यांच्या पालकांना त्यांची माहिती देण्यात आली आहे. पोलिस आता आग्रा आणि बिहार मध्ये चौकशी करीत आहेत.

Loading...

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना ठोठावली 10 वर्षाची तुरुंगवारी

Previous article

पाकिस्तानमध्ये हिंदू महिला पहिल्यांदाच लढणार निवडणुका, या महिलेने प्रचारला केली सुरुवात

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *