Royal politicsमुख्य बातम्या

राज्यात 180 तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती, लवकरच नव्या उपाययोजना राबवणार

0

राज्यात 180 तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याचे महाराष्ट्र राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. खुद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. यानंतर आता या 180 गावांच्या उपाययोजनेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी 8 उपाययोजना राबवल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले.

राबवल्या जाणार्‍या उपाययोजना – 

  •  पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सुविधा
  • टंचाईग्रस्त गावातील कृषि पंपाच्या येणार्‍या बिलात सूट
  • वीज जोडणी देखील खंडित केली जाणार नाही
  • शेतीशी संबंधित कर्ज वसुलीला स्थगिती
  • विद्यार्थांच्या परीक्षा शुल्कात सूट
  • जमीन महसुलातून सूट

Loading...

दुष्काळसदृश्य भागाच्या घोषणेनंतर राज्यात  लवकरच केंद्र सरकारचे पथक पाहणीसाठी दाखल होणार आहे. आणि त्यानंतर मदतीची घोषणा होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये उपाययोजनांना लवकरच सुरुवात होईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

दुष्काळ घोषित करणं आणि उपाययोजना राबवणे हे राज्यसरकारच्या अखत्यारीत असल्याने आम्ही दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली आहे. केंद्राची मदत देखील लवकरच मिळेल. चारा छावण्यांची वेळ या वेळी तरी आली नाही, ती येणार नाही असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसवर मुख्यमंत्र्यांची टीका –  

जलयुक्त शिवाराचं राजकारण करणं हा शेतकऱ्यांचा आणि मेहनत घेतलेल्या लोकांचा अपमान आहे. जलयुक्त शिवार त्यांना कळलेलं नाही म्हणून त्यांनी अंमलबजावणी केली नाही. आपला नाकारतेपणा झाकण्यासाठी जनतेचा अपमान करू नका अशी टीका त्यांनी केली.

 

Loading...

तर अजितदादांना धरणाच्या आसपास फिरू देऊ नका : उद्धव ठाकरे

Previous article

‘तुला पाहते रे’ फेम जयदीप या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *