Royal politicsटॉप पोस्ट

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणार्‍या तरुणाला अटक, 5 वर्षांनंतर पोलिसांना यश

0

गेल्या 5 वर्षापासून सतत चर्चेत असलेला विषय म्हणजे पुण्यातील नरेंद्र दाभोळकर यांची हत्त्या. 5 वर्षाच्या तपासानंतर पोलिसांना आता कुठे तपासात यश आल्याचे दिसते आहे. एटीएसकडून औरंगाबाद येथून सचिन प्रकाशराव अंधुरे याला अटक करण्यात आली आहे. सचिन अंधुरेनेच नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडल्या असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तो कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे. नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शरद कळसकर याला अटक केली होती, त्या तपासात पोलिसांना नरेंद्र दाभोळकर हत्त्येप्रकरणी धागेदोरे होती लागले आहेत.

सचिनला एटीएसने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे, अशी माहिती एटीएसचे प्रमुख आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली. सचिनला पुढील तपासासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपण्यात येणार आले आहे. 

Loading...

एटीएसने दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमधील कुंवरफल्ली या गावातून सचिनला ताब्यात घेतले होते. त्याचा गुन्ह्यात सहभाग असेल तर त्याला अटक केली जाईल अन्यथा सोडून देऊ असे एटीएस अधिकाऱ्यांनी सचिन अंधुरेच्या कुटुंबियांना सांगितले होते. त्यावेळी त्याच्या भावाने आपण देखील सोबत येत आहेत असे संगितले होते. सचिनला अटक करण्यात आलेल्यानंतर त्याचा भाऊ देखील पोलिसांसोबत मुंबईला आला होता.  परंतु चौकशी अंती सचिनचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एटीएसने त्याला सीबीआयकडे सोपवले.

राज्यातील बॉम्बस्फोट घडण्याच्या उद्देशाने बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जमविणाऱ्या आरोपींचा मागच्या आठवड्यात एटीएसने अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपीपैकी शरद कळसकर औरंगाबाद येथील आहे.  कळसकरच्या चौकशीत त्याच्या जवळच्या मित्रांच्या यादीत सचिन  अंधुरेचा समावेश असल्याचे एटीएसला सापडले होते.

शरद कळसकर आणि सचिन अंधुरे दोघेही औरंगाबादचे आहेत. कळसकर केसापुरी गावतील रहिवासी आहे. तर सचिन अंधुरे कुंवारफल्ली राजाबाजार येथे राहतो. निराला बाजार येथे एका कपडयाच्या दुकानात तो कामाला आहे. सचिनचे आई-वडील हयात नाहीत. तो पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसह कुंवारफल्ली येथे राहतो.

मे महिन्यात औरंगाबादमध्ये झालेल्या दंगलीत त्याचा सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे. शहागंज परिसरात झालेल्या दंगलीच्या वेळी हिंदू वसाहतीतील घरांना संरक्षण देण्याची भाषा सचिन करीत असल्याची माहिती मिळते आहे. सचिनच्या फेसबुक अकांऊटवरुन तो हिंदुत्ववादी विचारसरणीचा असल्याचे स्पष्ट होत आहे.

नरेंद्र दाभोलकर पुण्यातील बालंगधर्व रंगमंदिराकडून ओंकारेश्वर मंदिराकडे जाणार्‍या पुलावरून मॉर्निंगवॉकसाठी जात होते. तेव्हा सकाळी आठ ते साडे आठ दरम्यान अचानक 25 ते 30 वर्षं वयाचे दोन अज्ञात तरूण काळ्या स्प्लेंडरवरून आले. त्यांनी बाईक लावली आणि अत्यंत जवळून बंदुकीने   त्यांच्यावर चार गोळया झाडल्या होत्या. यात दाभोलकरांचा जागीच मृत्यू झाला होता.

मागील काही माहिन्यांपूर्वी गौरी लंकेश, गोविंद पानसरे, कलबुर्गी याच्या हत्त्येप्रकरणी पोलिसांना अनेक पुरावे हाती लागले आहेत आणि त्या संबंधी काहींना अटक देखील करण्यात आली आहे, पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे.

(Photo Input :- facebook/hamid dabholkar)

Loading...

Gulzar Birthday Special : गुलजार यांची ही गाणी तुम्हाला प्रेमात पाडतात

Previous article

PNB Scam :- पळकुट्या नीरव मोदीचा ज्या बँक शाखेत झाला होता घोटाळा त्याच बँकेत पुन्हा नवीन घोटाळा उघड

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *