Royal politicsटॉप पोस्ट

अमित शाह करत असलेल्या ध्वजारोहणावेळी खाली आलेल्या तिरंग्याचे ‘ते’ ट्विट दुरदर्शनने केले डिलीट

0

काल सर्वत्र 72 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्सव अनेक ठिकाणी  साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी देखील भाजप कार्यालयात ध्वज फडकवत स्वातंत्र्य दिवस साजरा केला. मात्र अमित शाह ध्वजारोहण करत असताना एक विचित्र घटना घडली.

अमित शाह यांनी ध्वज  फडकवण्यास दोरी ओढताच, तिंरगा थेट खाली जमिनीवर आला. मात्र अमित शाह यांनी नंतर तिंरगा फडकवला. ह्या घटनेचे लाईव्ह प्रेक्षपण दुरदर्शनवर झाले. एवढेच नाही तर दुरदर्शनने ही घटना ट्विट देखील केली. या घटनेचा  व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

Loading...

Tch, tch, tch…disaster”, असे दुरदर्शनचा अॅंकर म्हणताना लाईव्ह व्हिडिओमध्ये दिसून येते.

 

ही घटना जाणूनबुजून घडलेली नाही. ही कोणाबरोबर ही होऊ शकते. मात्र दुरदर्शनने या घटनेविषयी केलेले ट्विट डिलीट केले आहे. सरकारची वाहिनी असलेल्या दुरदर्शनने ही घटना लपवण्यासाठी त्यांचे दोन्ही ट्विट डिलीट केले.

डिलीट केलेले हे ट्विट देखील अनेक लोकांकडून कोट करत रिट्विट करण्यात आले.

https://twitter.com/DDNewsLive/status/1029591249815318528

https://twitter.com/DDNewsLive/status/1029591249815318528

https://twitter.com/DDNewsLive/status/1029594032375296000

ध्वजारोहणाचा हा व्हिडिओ भाजपच्या ट्विटर हॅंडलवर देखील ट्विट करण्यात आला. मात्र मजेशीर गोष्ट अशी की, त्यांनी मात्र दुरदर्शन प्रमाणे ट्विट डिलीट केले नाही. कदाचित दुरदर्शनवर ‘स्वयं सेन्सरशीप’चा दबाव असावा. भाजपच्या साईटवर हा व्हिडिओ अजूनही उप्लब्ध आहे.

ट्विट डिलीट करण्याची ही मिडियाची पहिलीच वेळ नाही. याआधी देखील अनेक वेळा भाजपच्या मंत्र्यांच्या विषयीचे ट्विट मिडिया हाऊसेसकडून डिलीट करण्यात आलेले आहे. पंतप्रधान मोदींनी चुकीने 600 कोटी लोकांनी भाजपला मतदान केल्याच्या विधानाविषयीचे ट्विट देखील अनेक मिडिया हाऊसेसकडून डिलीट करण्यात आले होते. यामध्ये एएनआय, इकोनाॅमिक्स टाईम्स आणि आज तक या सारख्या मिडिया हाऊसेसचा समावेश आहे.

(Input – www.altnews.in)

Loading...

क्रस्ना डायग्नोस्टीक्स संस्थेतर्फे सिद्धांत ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटमध्ये १३० झाडांचे मोफत वृक्षा रोपण

Previous article

Rafale Controversy : राफेल विमानप्रकरणी सोशल मिडियावर व्हिडिओ वॉर; भाजप, कॉंग्रेसनंतर आता ‘आप’ने देखील केला व्हिडिअो शेअर

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *