टॉप पोस्ट

Human Interest:- तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या प्रेमापोटी कधी आंदोलन केले आहे का? या विद्यार्थ्यांनी केले आहे जाणून घ्या का ?

0

तुमच्या शाळेमधील शिक्षकांची बदली होणार आहे आणि ती बदली होऊ नये म्हणून तुम्ही कधी आंदोलन केले आहे का ? किंवा भावनिक होऊन त्या शिक्षकाची बदली होऊ नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी रडून रडून आकांत मांडला आहे का ? कदाचित नाही. अशा गोष्टी खूप कमी बघायला मिळतात. शिक्षक विद्यार्थ्यामधील ते भावनिक नातं संपत चालले आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी फक्त एक गुलाबाचे फुल देऊन शिक्षक दिन साजरा करण्यापुरताच शिक्षकांचा आदर मर्यादित राहिला आहे; पण काही घटना अशा घडतात की, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते किती सुंदर, स्वच्छ व प्रामणिक असते हे सिध्द करतात.

28 वर्षीय  जी. भगवान, तामिळनाडूमधील सरकारी हायस्कूल मधील 6 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवणारे शिक्षक. सरकारी आदेशानुसार, त्यांची बदली दुसऱ्या शाळेत झाली. पण जेव्हा ही गोष्ट त्यांच्या विद्यार्थ्यांना कळाली, तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी रडून अक्षरशः आकांत मांडला. जर सरांची बदलली झाली तर आम्ही शाळेतच येणार नाही अशी भुमिका विद्यार्थ्यांनी घेतली.यावरच विद्यार्थी न थांबता त्यांनी अादोंलनच केले. त्यांच्या पालकांनी देखील याबाबतीत विद्यार्थ्यांचे समर्थन केले.

Loading...

                                                                                    (The News Minute)

सरांच्या भोवती विद्यार्थ्यांनी अक्षरशः प्रेमाचे कडेच घातले. त्यांना जाऊ देऊ नये म्हणून आपुलकीने सरांना घट्ट पकडून ठेवले. एका विद्यार्थ्याने तर त्यांना मागून मिठीच मारली आहे. भावनिक होऊन विद्यार्थ्यांबरोबर ते सर ही रडताना दिसतात.

विद्यार्थी व सरांची ही चित्रे मिडियामध्ये आल्यानंतर, त्याने सरकारी यंत्रणेला देखील दखल घ्यायला भाग पाडले. जी भगवान यांची बदली तीरूतानी येथे झाली होती. आता ती बदलली 10 दिवसांसाठी थाबंवण्यात आली असून, ते आता कायमस्वरूपी वेलीग्रामच्या शाळेत राहणार की, त्यांची बदली होणार याचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे.

द न्यूज मिनिट यांच्याशी बोलताना भगवान म्हणाले की, “ही माझी पहिलीच नोकरी आहे. मी 2014 साली ग्रज्युेएट शिक्षक म्हणून वेलीग्रामच्या सरकारी हायस्कूलमध्ये रूजू झालो होतो. जर तुम्ही शिक्षक व विद्यार्थ्यांचे प्रमाण बघितले तर शिक्षकांचे प्रमाण अतिरिक्त आहे. त्यामुळे त्यांनी मला दुसऱ्या शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला आणि माझी बदली तीरूतानी येथे केली.”

                                                                          (The News Minute)

तसेच विद्यार्थी म्हणाले की, “आजपर्यंत अनेक शिक्षक शाळा सोडून गेले; पण आम्हाला एकाही शिक्षकाबद्दल असं काही वाटलं नाही.”

विद्यार्थ्यांशी एवढे चांगले नाते कसे तयार केले? असा प्रश्न विचारला असता, भगवान द न्यूज मिनिटला म्हणाले की, “मी विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिक शिक्षणापेक्षा त्यांच्याशी अधिक गोष्टींविषयी संवाद साधला. मी त्यांना कथा सांगण्याचा प्रयत्न केला. मला त्यांची कौटुंबिक पार्श्वभुमी माहित आहे. मी त्यांच्याशी त्यांच्या भविष्याविषयी बोलायचो. प्रोजेक्टरच्या मदतीने त्यांना विविध गोष्टी शिकवायचो. प्रोजेक्टरच सेशन त्यांच्यासाठी मनोरंजन असायचे. त्यांना जणू काही सिनेमा हाॅलमध्ये बसल्या सारखेच वाटायचे. हे सर्व शक्य झाले कारण मी नवीन गोष्टींचा प्रयत्न केला. त्यांच्याशी खरे नाते जोडण्याचा प्रयत्न केला. मी शिक्षकापेक्षा त्यांच्यासाठी मित्र आहे, त्यांचा भाऊ आहे.”

आजच्या शिक्षण व्यवस्थेत अशाच शिक्षकांची गरज आहे जे पुस्तकी खरडपट्टीपेक्षा विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानही देतात.

एकीकडे शिक्षक व विद्यार्थ्यांमधील प्रामाणिक नाते संपत असताना, अशा काही घटना ते नाते टिकून ठेवतात. इंग्रजी व गणिताच्या शिक्षकांशी तर छत्तीसचा आकडा. अशावेळेस ही लहान मुले शिक्षक व विद्यार्थ्यांमधील नाते काय असते ते दाखवून देतात.

 

(The story was originally published on The News Minute )

 

Loading...

वेगवेगळ्या धर्माचे कारण सांगत पासपोर्ट देण्यास नकार, सुषमा स्वराज यांच्याकडून कारवाई

Previous article

अमित शाह संचालक पदी असलेल्या बँकेत बंद झालेल्या नोटांचा सर्वात जास्त भरणा- RTI

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *