मुख्य बातम्या

भाभीजी के पापड खाऊन कोरोना बरा होतो? ; राऊतांचा भाजपाला सणसणीत टोला

0

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 51,18,254 वर गेला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 97,894 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 1,132 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 83,198 लोकांना जीव गमवावा लागला आहे.
महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढत आहे. याच दरम्यान कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्रात सरकार अपयशी ठरत असल्याची टीका करण्यात येत आहे. मात्र अशी टीका करणाऱ्यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
‘महाराष्ट्रात अनेक लोक कोरोनातून बरे होत आहेत. महाराष्ट्र सरकारवर टीका करणाऱ्या प्रत्येकाने हे लक्षात घ्यायला हवं. लोक ‘भाभीजी के पापड’ खाऊन बरे होतात का?’ असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. कोरोनावर आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या विधानावर राऊत यांनी असा टोला लगावला आहे. तसेच आई आणि भावालाही कोरोनाची लागण झाल्याचं राज्यसभेत राऊत यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-

काँग्रेस देशातील प्रमुख विरोधी पक्ष,जमिनीवरचे काम त्यांनी आता सुरू करायला हवे – संजय राऊत
आंदोलनावरुन संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर जोरदार टीका, म्हणतात…
.. नाहीतर मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील ; संभाजी ब्रिगेडचा गंभीर इशारा
अध्यादेश काढा अन्यथा परिणाम भोगा ; मराठा आरक्षणावरुन उदयनराजे संतापले
उद्धव ठाकरेंनी 5 मिनिटं मराठा आरक्षणावर बोलूनच दाखवावं ; चंद्रकांत पाटलांचा जोरदार हल्ला

Loading...

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. भाभीजी के पापड खाऊन कोरोना बरा होतो? ; राऊतांचा भाजपाला सणसणीत टोला InShorts Marathi.

Loading...

उर्मिला मातोंडकरच्या टीकेनंतर कंगनाची सारवासारव म्हणाली “सनी लिओनीला….

Previous article

शीर धडावेगळं झालं तरी चालेल पण ते कधीही झुकणार नाही ; कंगना रनौत कडाडली

Next article

You may also like

Comments

Comments are closed.