Royal Entertainmentमुख्य बातम्या

तुम्ही गायीचं दूध पिताय की म्हशीचं? जाणून घ्या कोणतं दूध आहे सर्वोत्तम!

0

दूध पिणं तसं सर्वांनाच आवडतं. आपल्या शरीराला दुधामुळे केवळ लहान मुलेच नाहीत, तर सर्व वयोगटातील व्यक्तींना किती फायदा मिळतो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. बाळ जन्मल्यापासून आईचं दूध, त्यानंतर गायीचं किंवा म्हशीचं दूध, काही ठिकाणी पाकिटातील दूध अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या दुधाचा आपल्या आहारात समावेश असतोच. 
मात्र, गायीच्या किंवा म्हशीच्या दूधापैकी कोणते दूध आपल्याला सर्वाधिक उपयुक्त आहे, हे जाणून घेणेही तितकेच गरजेचे आहे. चला तर, जाणून घेऊयात आपल्या सर्वांसाठी कोणतं दूध सर्वश्रेष्ठ आहे?
दुधात कॅल्शियम असत. आपल्या दातांच्या आणि हाडांच्या बळकटीसाठी डॉक्टर्स नेहमीच आपल्याला दूध पिण्याचा सल्ला देतात. पौष्टिकतेसाठी गायीचं आणि म्हशीचं, दोन्ही प्रकारचं दूध आपल्यासाठी फायदेशीर ठरतं. मात्र, म्हशीच्या दुधात कार्ब्स (कर्बोदके) जास्त असतात आणि त्यातुलनेत गायीचं दूध हलकं असतं.
म्हशीचं दूध जास्त घट्ट असतं. त्यामुळे त्यात फॅटचं (चरबी) प्रमाण जास्त असतं. गायीच्या दुधात ३ ते ४ टक्के इतकं फॅट असतं तर म्हशीच्या दुधात फॅटचं प्रमाण ७ ते ८ टक्क्यांइतकं असतं. म्हशींची दूध पचायला जड असतं तर गायीचं दूध हलकं आणि पचण्यास सोपं असतं. त्यामुळे लहान मुले आणि वयस्कर लोकांना गायीचं दूध पिणं कधीही चांगलं.
म्हशीच्या दुधात गायीच्या दुधाच्या तुलनेत १० ते ११ टक्के जास्त प्रोटीन(प्रथिनं) असतात. त्यामुळे ज्यांना प्रथिनांची कमतरता जाणवते त्यांना म्हशीचं दूध पिणं फायदेशीर ठरते. जर तुम्ही कमी पाणी पिता आणि तुम्हाला पाण्याची कमतरता नसावी असं वाटतं तर तुम्ही गायीचं दूध पिऊ शकता. कारण गतीच्या दुधात ९० टक्के इतकं पाणी असतं, जे तुम्हाला हायड्रेट ठेवतं.
म्हशीच्या दुधात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते. त्यामुळे ज्यांना हायपरटेन्शन तसेच किडनीशी संबंधित विकार आहेत, अशांना म्हशीचं दूध पिणं अत्यंत उपयुक्त ठरेल. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांना गायीचं दूध पिणं वरदान ठरेल. कारण गायीच्या दुधात फॅटचे प्रमाण कमी असते. १०० मिली. दुधात फक्त ६१ कॅलरीज असतात.
तसं पाहता, प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी दूध पिणं फायदेशीरच आहे. तरुणवर्गाला कमी फॅट असणारे किंवा स्किम्ड मिल्क गरजेचे असते. तर ज्यांच्या शरीरात प्रथिनं, चरबी आणि कर्बोदकांचे कमतरता असते, त्यांना म्हशीचं दूध खूप उपयुक्त ठरते.
The post तुम्ही गायीचं दूध पिताय की म्हशीचं? जाणून घ्या कोणतं दूध आहे सर्वोत्तम! appeared first on Dainik Prabhat.

स्त्रियांचे आरोग्य आणि समुपदेशन…

Previous article

तुम्ही गायीचं दूध पिताय की म्हशीचं? जाणून घ्या कोणतं दूध आहे सर्वोत्तम!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.