Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

माझ्या नावाची उगाचच चर्चा करू नका,पवारांची राष्ट्रवादीच्या नेत्यांना तंबी

0

टीम महाराष्ट्र देशा- आगामी लोकसभा निवडणूक पुण्यातून लढवण्याच्या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पूर्णविराम दिला असून मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. माझ्या नावाची उगाचच चर्चा करू नका, अशी तंबी पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना दिली.

पार्थ पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगू लागल्या आहेत मात्र पार्थ यांच्या उमेदवारीला त्यांचे आजोबा  शरद पवार यांनी थेट विरोध केला आहे. पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर सामान्य कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार? असा सवाल शरद पवार यांनी विचारला आहे.

Loading...

दरम्यान,आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही विरोधी पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे 25 जागांची मागणी केल्याचे समजते. आता काँग्रेस पक्ष यावर काय भूमिका घेतो यावर आघाडीचे भवितव्य अवलंबून असल्याचे सांगण्यात येते.

महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसांच्या बैठकीला मुंबईत सुरुवात झाली आहे . पक्षाचे अध्यक्ष शरद पवार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील निवडणुकांची घोषणा शनिवारी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला महत्त्व आले आहे.

माढ्यातुन राष्ट्रवादीचा मीच ऊमेदवार असणार – आ. शिंदे

शरद पवार नव्हे तर ताबडतोब क्लीनचीट देण्याचे काम देवेंद्र फडणवीस करतात : भुजबळ

Loading...

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी : लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला हव्या आहेत ‘इतक्या’ जागा

Previous article

बलात्काराच्या घटनेनंतर गुजरातमध्ये यूपी-बिहारींविरोधात हिंसक आंदोलन पेटलं

Next article

You may also like

Comments

Comments are closed.