Royal Entertainmentमुख्य बातम्या

‘आई माझी काळूबाई’ मालिकेलीत वाद पोहोचला उदयनराजेंच्या दरबारात

0

सातारा – गेल्या अनेक दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीत एक चर्चा जोरदार रंगू लागली आहे ती म्हणजे, ‘माझी आई काळुबाई’ या मालिकेतील मुख्य अभिनेत्री अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांच्यातील वाद. दरम्यान, आता हा वाद साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यापर्यंत पोहोचला आहे.
सातारा चित्रीकरणाच्या सेटवर प्राजक्ता गायकवाड यांची नेमकी वस्तुस्थिती अलका कुबल यांनी उदयनराजे भोसले यांच्यासमोर मांडली. यानंतर उदयनराजेंनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासोबत मोबाईलवरून चर्चा करुन हा वाद लवकरात लवकर मिटवावा आणि पुन्हा एकत्र येऊन काम करा, अशी विनंती केली.

‘माझी आई काळुबाई’ या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी रविवारी खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा येथील जलमंदिर पॅलेस निवासस्थानी भेट घेतली. आणि संपूर्ण वस्तुस्थिती उदयनराजे यांना सांगितली.
The post ‘आई माझी काळूबाई’ मालिकेलीत वाद पोहोचला उदयनराजेंच्या दरबारात appeared first on Dainik Prabhat.

थंडीच्या दिवसांमध्ये आवळा खाणे आहे खूपच फायदेशीर.. कधी आणि कसा खावा जाणून घ्या..

Previous article

‘या’ अभिनेत्याच्या मागे पूजा सावंत झाली क्रेझी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.