मुख्य बातम्या

राज्यात महाविकास आघाडी बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा – रामदास आठवले

0

 बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतच्या वादानंतर शिवसेनेच्या काही शिवसैनिकांनी एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्यानं सर्वत्र वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काम करत असलेलं शिवसेनेचं सरकार सुडबुद्धीचं राजकारण करत आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण गढूळ झाल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

निवृत्ती नेव्ही अधिकारी मदन शर्मा यांच्यावर हल्ला कारणाऱ्यांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल झाला नाही. कंगनालाही अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यात वातावरण गढूळ आहे. त्यामुळे मविआ सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी पुढे आली आहे
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 13, 2020

शिवसैनिकांनी माजी नौदल अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीला शिवसेनेने समर्थन दर्शवला आहे. अभिनेत्री कंगणा राणावतलाही यांचा अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं आठवलेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-

राज्यात सध्या बदल्यांचा धंदा सुरू झालाय ; फडणवीसांचा राज्यसरकारवर जोरदार हल्ला
लॉकडाऊन हा विषय आता संपला ; राजेश टोपे यांचा मोठा खुलासा
महाविकास आघाडीने लोकशाहीचा गळा घोटला ; भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात ठाकरे सरकारचे अत्याचार वाढलेत केंद्राने लवकर हस्तक्षेप करावा – कंगना राणौत
ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आता कंगनाचीही चौकशी होणार ; गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना कडक आदेश

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राज्यात महाविकास आघाडी बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा – रामदास आठवले InShorts Marathi.

नागपुरातील लॉकडाऊनबाबत महाविकास आघाडीतील मंत्र्यामध्ये मतभिन्नता

Previous article

….म्हणजे माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाणीबाबत मुख्यमंत्र्यांनी हल्ल्याचं समर्थन केलंय ; नवनीत राणांची टीका

Next article

You may also like

Comments

Comments are closed.