मुख्य बातम्या

नागपुरातील लॉकडाऊनबाबत महाविकास आघाडीतील मंत्र्यामध्ये मतभिन्नता

0

नागपुरात लॉकडाऊनबाबत महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये मतभिन्नता दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात सध्या कोरोनाची स्थिती स्फोटक आहे. त्यामुळे नागपुरात आठ दिवस कडक लॉकडाऊन करण्याची मागणी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती.
मात्र, नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेतला. तर, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखही नागपुरात लॉकडाऊन न करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांची परस्पर विरोधी मतं असल्याचं चित्र आहे.
नागपुरात कोरोनामुळे दररोज 50 जणांचा मृत्यू होत आहे. गेल्या 24 तासांत 2,343 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. पण प्रशासन आणि सरकारचे मंत्री लॉकडाऊनबाबत ठोस निर्णय घेताना दिसत नाही. मंत्री विजय वडेट्टीवार आणि पालकमंत्री नितीन राऊत यांची लॉकडाऊनबाबत परस्पर विरोधी मतं आहेत.
नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमुख लॉकडाऊन न लावण्यावर ठाम आहेत. अनेकांची मगणी असूनही काल झालेल्या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय झाला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांमध्ये लॉकडाऊनवरुन मतभिन्नता दिसून येते आहे.
महत्वाच्या बातम्या :-

राज्यात सध्या बदल्यांचा धंदा सुरू झालाय ; फडणवीसांचा राज्यसरकारवर जोरदार हल्ला
लॉकडाऊन हा विषय आता संपला ; राजेश टोपे यांचा मोठा खुलासा
महाविकास आघाडीने लोकशाहीचा गळा घोटला ; भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात ठाकरे सरकारचे अत्याचार वाढलेत केंद्राने लवकर हस्तक्षेप करावा – कंगना राणौत
ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आता कंगनाचीही चौकशी होणार ; गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना कडक आदेश

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. नागपुरातील लॉकडाऊनबाबत महाविकास आघाडीतील मंत्र्यामध्ये मतभिन्नता InShorts Marathi.

राज्यात अजून किती डोळ्यांसमोर महिलांना उद्ध्वस्त होताना पाहायचं? चित्रा वाघ संतापल्या

Previous article

राज्यात महाविकास आघाडी बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा – रामदास आठवले

Next article

You may also like

Comments

Comments are closed.