Royal Entertainmentमुख्य बातम्या

“दीदींच्या दैवी आवाजाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही’- राज ठाकरे

0

मुंबई – गानसम्राज्ञी ‘लता मंगेशकर’ यांचा आज वाढदिवस आहे. आतापर्यंत 25 हजारांहून अधिक गाणी गायलेल्या लतादीदी यांचा आज स्वतंत्र असा मोठा चाहतावर्ग आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “जो आवाज दैवी आहे, ज्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही, संपूर्ण सूर काय असतो हे ज्यांचा आवाज ऐकल्यावर कळतं, आपल्या महाराष्ट्राचा जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेला आणि ऐकलेला एकमेव आवाज, जो ऐकल्यावर तो अनादी आहे. आणि अनंत देखील, तो म्हणजेच लतादीदींचा आवाज..” असं राज म्हणाले.

Posted by MNS Adhikrut on Sunday, 27 September 2020

2001 मध्ये लता मंगेशकर यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने सन्मानित करण्यात आलं. याशिवाय, 1969 मध्ये ‘पद्मभूषण’, 1989 मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ आणि 1999 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानेही दीदींना गौरविण्यात आले आहे.
The post “दीदींच्या दैवी आवाजाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही’- राज ठाकरे appeared first on Dainik Prabhat.

‘त्या’ व्हिडिओवरून करण जोहरची होणार चौकशी?

Previous article

#HBD: मराठी चित्रपटसृष्टीतील धडाकेबाज अभिनेते ‘महेश कोठारे’

Next article

You may also like

Comments

Comments are closed.