Royal Entertainmentटॉप पोस्ट

‘झिंगाट’ गाणं पुन्हा एकदा आलय तुम्हाला वेड लावायला

0

मराठीतील झिंगाटने लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच गाण्यावर थिरकायला लावले होते. आता सैराटचा हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’ मधील ‘झिंगाट’ हे गाणे रिलीज झालं आहे. मराठीतील गाण्याप्रमाणे या गाण्याला देखील अजय-अतुल यांचेच म्युझिक असून हिंदीतील गीत हे अमिताभ भट्टाचार्या यांनी लिहीले आहे.

म्युझिक कायम ठेवून फक्त गाण्यातील शब्द हिंदीला अनुसरून बदलण्यात आले आहे. मराठीतील झिंगाट प्रमाणे हे गाणे देखील सर्वांना वेड लावेल हे निश्चित. सैराटच्या यशात झिंगाट गाण्याचा महत्वाचा वाटा होता. लोंकानी अक्षरशः थेअटरमध्ये देखील या गाण्यावर डान्स केला होता. त्यामुळे आता हिंदीतील झिंगाट पुन्हा एकदा लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना बेभान नाचावयाला लावणार आहे.

Loading...

ईशान व जान्हवी यांची गाण्यातील केमिस्ट्री  छान जूळून आलेली आहे.

या चित्रपटात परश्याची भुमिका शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर तर आर्चीची भुमिका श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर साकारणार आहे. ईशानचा हा दूसरा चित्रपट असणार आहे. त्याने या आधी इराणी डायरेक्टर माजिद मजीदी यांच्या ‘बियॉन्ड द क्लाउड्स’ या चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. तर जान्हवीचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे.

धडकचे डायरेक्शन शंशाक खैतान करणार आहे. शंशाक खैतानने या आधी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ व ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ हे चित्रपट डायरेक्ट केले आहेत.  तसेच म्युजिक मराठी प्रमाणे अजय-अतुल यांचेच असणार आहे. तर प्रोडक्शन झी स्टुडिओ व धर्मा प्रोडक्शन यांचे असणार आहे.

‘धडक’  20 जुलै रोजी संपुर्ण देशात रिलीज होणार आहे.

Loading...

Karwan Movie Trailer : तीन अनोळखी व्यक्ती, दोन डेड बाॅडी आणि आयुष्यभर लक्षात राहणार प्रवास

Previous article

‘भारत महिलांसाठी जगातील सर्वात असुरक्षित देश’ थॉमसन रॉयटर्सचा अहवाल; राष्ट्रीय महिला आयोगा’ने फेटाळला

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *