Royal Entertainmentटॉप पोस्ट

‘देसीगर्ल’ आणि निक जोन्सचा थाटामाटात साखरपुडा; सोशल मीडियावर केले फोटो शेअर

0

अखेर बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा आणि अमेरिकन गायक निक जोन्स यांचा साखरपुडा आज मुंबईत पार पडला. कुटुंबीय, मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत आज  साखरपुडा करून या सेलेब्रिटी जोडीने आपलं नातं अधिकृतरित्या घोषित केले. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होत आहेत.

 

pc nick jones engagement
Loading...

Priyanka – nick jonas engagement

या जोडीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करून आपल्या साखरपुड्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले. प्रियांका आणि जोन्स बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर होती. परंतु त्यांनी आपल्या नात्याबद्दल स्वतःहून कधी माहिती दिली नव्हती.

देसी गर्ल प्रियंका चोप्राने आपल्या फॅन्ससोबत रोमॅंटिक फोटो  “टेकन विथ ऑल माय सोल” असा कॅप्शन देत शेअर केला. निकने देखील हाच फोटो शेअर करत फ्युचर मिसेस जोन्स, माय हार्ट, माय लव असा कॅप्शन देत शेअर केला. 

View this post on Instagram

Taken.. With all my heart and soul..

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

मागील महिन्यात निक ने लंडन मधील टिफणी हे ज्वेलरी साठी प्रसिद्ध असलेल्या स्टोर मधून तब्बल 2.1 कोटीची डियमंडची आंगठी खरेदी केली.

आज आपल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत आज प्रियांका आणि निकच्या नात्याला नवी ओळख मिळाली.  आपल्या आयुष्याचा नव्या वळणावर दोघे अत्यंत खुश दिसत होते. प्रियंकाला साखरपुडा या आधीच पार पडला होता. परंतु भारतीय पारंपरिक पद्धतीने रोका आज पार पडला. आता या नंतर मित्रमंडळींसाठी , आणि बॉलीवूड कलाकारांसाठी पार्टीच आयोजन करण्यात येणार आहे.

Loading...

या आहेत जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टाॅप 10 एक्ट्रेस

Previous article

‘मी भीक मागतो, आम्हाला मदत करा; अन्यथा 50 हजार लोकांचा मृत्यू होईल’

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *