Royal Entertainmentमुख्य बातम्या

‘लक्ष्मी बॉम्ब’च्या अडचणी थांबेना, चित्रपटाचे नाव बदलण्याची केली मागणी

0

मुंबई – चित्रपटरसिक ज्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत, तो अक्षय कुमार अभिनित ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 9 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पोस्टर रिलीजपासूनच याची जोरदार चर्चा असून ‘कंचना 2’ या सुपरहिट तमिळ चित्रपटाचा हा रिमेक आहे.
दरम्यान, आता प्रदर्शना पूर्वीच लक्ष्मी बॉम्ब चित्रपट अडचणींच्या घेऱ्यात सापडताना दिसत आहे. “लक्ष्मी बॉम्ब” या चित्रपटाचे नाव बदलावे अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. या नावामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे म्हणत, राष्ट्रीय हिंदू सेनेने या चित्रपटाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी या संदर्भात एक ट्विट सुद्धा पोस्ट केले आहे.

Hindu Sena has given a complaint letter @PrakashJavdekar to take appropriate action against the promoters, cast and crew of the upcoming movie “Laxmmi Bomb” starring @akshaykumar and directed by Sh Raghava Lawrence for making mockery of Hindu Goddess Laxmi’s name, @ANI pic.twitter.com/5UjVfXBNJB
— Vishnu Gupta (@VishnuGupta_HS) October 20, 2020

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हिंदू सेनेने लक्ष्मी बॉम्ब चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक यांच्याविरोधात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून या चित्रपटाला विरोध दर्शवला होता. तसेच, आम्ही सांगितलेले बदल केले नाही तर हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही”. असा इशारा देखील हिंदू सेनेने दिला होता.
The post ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या अडचणी थांबेना, चित्रपटाचे नाव बदलण्याची केली मागणी appeared first on Dainik Prabhat.

छोट्याशा विलायचीची दिसेल कमाल दररोज करा सेवन, दूर होतील या ५ मोठ्या समस्या !

Previous article

नवरात्रीच्या काळामध्ये काय करावे काय करू नये जाणून घ्या…!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.