Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

विनोद तावडे राजीनामा द्या ! आता तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त उल्लेख

0

टीम महाराष्ट्र देशा : शालेय शिक्षण विभागाकडून सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक शाळांमध्ये वाटप करण्यासाठी निवडण्यात आलेल्या आणखी एका पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. संतांचे जीवन प्रसंग या पुस्तकात तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त उल्लेख करण्यात आले आहेत. गोपीनाथ तळवलकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त लिखाण असल्याचे गुरुवारी उजेडात आले. त्यापाठोपाठ आता दुस-या पुस्तकात तुकाराम महारांजाबाबत आक्षेपार्ह उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading...

तुकाराम महाराजांची बायको फार रागीट. तोंडाला कुत्रे बांधावे ना तसे, तिच्या तोंडून कायम नेहमी शिव्याच बाहेर यायच्या. ह्यत आमचं येडं असं आपल्या पतीला ती म्हणायची. पण मनाने फार प्रेमळ आणि पतिभक्त. काशी आणि महादू ही त्यांची मुले, असा आक्षेपार्ह उल्लेख या पुस्तकात आहे.

Loading...

५० लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी पुण्यातील भाजप आमदाराविरोधात गुन्हा दाखल

Previous article

#MeToo :- लैंगिक शोषणाच्या आरोपांची तपासणी करण्यासाठी समितीची नेमणूक करणार- मेनका गांधी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.