Royal politicsटॉप पोस्ट

अरविंद केजरीवाल यांना प्रादेशिक पक्षांचे देखील समर्थन, लगातार सहाव्या दिवशी आंदोलन सुरूच

0

नवी दिल्ली –

अरविंद केजरीवाल व त्यांच्या तीन मंत्र्यांचे दिल्ली चे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात धरणे आंदोलन आज सहाव्या दिवशी देखील सुरूच आहे. या नेत्यांमधील मंत्री सतेंद्र जैन व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे बुधवार पासून अनिश्चित काळासाठी उपोषणावर बसले आहेत. फायनेंशियल टाईम्सनुसार डाॅक्टरांचे म्हणणे आहे की, उपोषणामुळे या दोन्ही नेत्यांचे बल्ड शुगर लगातार कमी होत चालले आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले होते की, जर उपोषण जबरदस्ती तोडण्याचा प्रयत्न केला गेला तर ते पाणी पिणे देखील बंद करतील.

Loading...

अरविंद केजरीवाल व त्यांच्या तीन मंत्र्यांच्या मागण्यामध्ये आयएएस अधिकार्‍यांनी आपला संप मागे घ्यावा व रेशन ची डोरस्टेप डिलीवरी लागू करावी या मागण्यांचा समावेश आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मागील चार महिन्यापासून आईएएस अधिकारी बैठकीना उपस्थित राहत नाहीयेत, त्यामुळे कामकाज पुर्णपणे बंद पडले आहे. तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या बाबतीत लक्ष घालण्याची व अधिकाऱ्यांचा संप मागे घेण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा – 

अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, आयएएस अधिकार्‍यांचा संप मागे घेण्याची मागणी

शुक्रवारी अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत विचारले होते की, जर प्रधानमंत्रीच्या बैठकीत अधिकारी उपस्थित नाही राहिले तर ते काम करू शकतील का? रिपोर्टनुसार,  मागण्या पुर्ण नाही झाल्या तर आम आदमी पार्टी पंतप्रधानांच्या घरासमोर प्रदर्शन करण्याची योजना करत आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांना प्रादेशिक पक्षांचे समर्थन मिळताना दिसून येत आहे. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, राष्ट्रीय लोक दलाचे जयंत चौधरी, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, कमल हसन आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा समावेश आहे. सीपीआई आणि सीपीएम यांच्या बरोबरच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी देखील अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनाचे समर्थन केले आहे.

हे ही वाचा – 

दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला तर आम्ही भाजपसाठी प्रचार करु, नाहीतर…

(PHOTO INPUT :- FACEBOOK/AAM AADMI PARTY)

Loading...

1992 ते 2018 मध्ये भारतात 47 पत्रकारांची हत्या, तर जम्मू -काश्मीरमध्ये 19 पत्रकारांची हत्या

Previous article

OPINION : हू किल्ड द प्रेस ?

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *