Royal Entertainmentमुख्य बातम्या

रणबीर कपूरसोबत झळकणार दीपिका-आलिया

0

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा काही काळापासून कोणताही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्याच्या आगामी “ब्रह्मास्त्र’ चित्रपटात रणबीरसोबत प्रथमच आलिया भट्टला पाहण्यासाठी चाहते दीर्घ काळापासून प्रतीक्षेत आहेत. परंतु हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे अद्याप निश्‍चित नाही. त्यातच एका चित्रपटात रणबीर कपूरसोबत त्याची गर्लफ्रेंड आलिया भट्ट आणि एक्‍स-गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण एकत्रित काम करणार आहे.
गतवर्षी संजय लीला भंसाली यांनी “बैजू बावरा’ चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिका साकारणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. यात दोन मुख्य नायक आणि दोन नायिका असणार आहे. या दोन नायिका आलिया भट्ट आणि दीपिका पादुकोण यांचे नाव निश्‍चित करण्यात आले असून या दोन्ही नायिका संजय लीला भंसाली यांच्या फेवरिट आहेत.
भंसाली यांनी दीपिका आणि आलिया यांना स्क्रिप्ट वाचून दाखविली असून दोघींनाही त्यांच्या भूमिका आवडल्या आहेत. विशेष म्हणजे, “बैजू बावरा’मध्ये आलिया ही रणबीरच्या ऑपोझिट रोल साकारताना दिसणार आहे, जी ऑरिजनल चित्रपटात मीना कुमारीने भूमिका साकारली होती.
तर दीपिका पादुकोण ही डाकू रूपमतीच्या भूमिकेत दिसणार आहे. असे झाल्यास दीपिका आणि आलिया यांचा हा एकत्रितपणे पहिल चित्रपट ठरेल.
दरम्यान, रणबीर कपूरने संजय लीला भंसाली यांच्या “सांवरिया’ चित्रपटातून डेब्यू केले होते, जो फ्लॉप ठरला होता. आता “बैजू बावरा’ चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर धम्माल करणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
 
The post रणबीर कपूरसोबत झळकणार दीपिका-आलिया appeared first on Dainik Prabhat.

तुमच्या लग्न समारंभात या अभिनेत्रींना नाचवायचे असेल तर त्यांना द्यावे लागेल एवढे मानधन !

Previous article

चमकदार व सुंदर दात पाहिजे असेल, तर नक्की करा हे असरदार घरगुती उपाय…!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.