Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

माढ्याचं तिकीट मलाच मिळायला हवं!,राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याचा हट्ट

0

टीम महाराष्ट्र देशा– शरद पवार यांनी नेतृत्व केलेला मतदारसंघ म्हणून माढा लोकसभा मतदारसंघांची ओळख आहे. मोदी लाटेतसुध्दा या मतदारसंघांने राष्ट्रवादीला साथ दिली होती. त्यामुळे या मतदारसंघांच्या उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच आहे. माढा लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील,सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हे इच्छुक आहेत. पण, आता माजी आमदार दिपकराव साळुंखे यांनीही उमेदवारीची तयारी चालविल्याने तिढा निर्माण झाला आहे.

काँग्रेसच्या माजी आमदारासाठी शिवसेनेच्या आमदाराचा आत्मदहनाचा इशारा!

Loading...

माढा हा राष्ट्रवादीसाठी सुरक्षित मतदारसंघ आहे. माण, फलटण, सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा या विधानसभा मतदारसंघांत समावेश होतो. २००९ साली शरद पवार यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. २०१४ साली मोदी लाटेत अटीतटीच्या लढतीत येथून विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. देशमुख यांच्यामागे मोहिते–पाटील यांच्या विरोधकांची खेळी आहे का, यादृष्टीनेही पाहिले जात आहे. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते – पाटील यांची जन्मशताब्दी शासनाच्या वतीने साजरी केली जात असून यानिमित्ताने पाटील यांची भाजपशी जवळीक वाढली असल्याचे काहींनी पवारांच्या कानावर घातले आहे. माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी, असा एक मतप्रवाह पक्षात आहे. तर, मोहिते – पाटील यांचे पवार यांच्याशी असलेले संबंध पाहता तेच उमेदवारीचे दावेदार होऊ शकतात, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. या तिढय़ात पवार विद्यमानांना पसंती देणार की भाकरी फिरवणार याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.

महाराष्ट्राच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या ‘या’ प्रलंबित प्रश्नासाठी शरद पवार घेणार वकील हरिष साळवे यांची भेट

दरम्यान,शरद पवार माढ्याचे खासदार असताना त्यांचा चक्रधारी (गाडीचा चालक) म्हणून प्रवास केला आहे, तसंच मला या मतदारसंघाची खडानखडा माहिती आहे. त्यामुळे माढ्याचं तिकीट मलाच मिळायला हवं, असं माजी आमदार दिपकराव साळुंखे यांनी म्हटलं आहे.शरद पवार यांचा संपर्कप्रमुख असताना मी गाव ना गाव फिरलो आहे. त्यामुळे या मतदारसंघाची माहिती असलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे, असं ते म्हणाले.

Loading...

‘अमिताभचं सत्यही लवकरच बाहेर येईल’

Previous article

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी : मुंडे

Next article

You may also like

Comments

Comments are closed.