Royal politicsटॉप पोस्ट

मोदी सरकारची अग्निपरीक्षा, विरोधक संसदेत मांडणार अविश्वासदर्शक प्रस्ताव

0

आज केंद्रातील मोदी सरकार विरोधात संसदेमध्ये 11 वाजता अविश्वासदर्शक प्रस्ताव मांडण्यात येण्यास सुरुवात झाली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यावर बुधवारी तेलगू देसम पार्टी आणि इतर विरोधी पक्षांकडून मांडण्यात आलेला अविश्वासदर्शक प्रस्तावाच्या चर्चेला लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनीमंजूरी दिली होती. आज लोकसभात टीडीपी चर्चेला सुरुवात करेल.

आज लोकसभेत चर्चा करण्यात येणार्‍या अविश्वासदर्शक ठरावचे अपडेट-

Loading...

टीडीपी च्या लोकसभेत 16 जागा आहे.  तेलगू देसम पार्टीच्या जयदेव गल्ला यांनी अविश्वासदर्शक प्रस्ताव मांडण्यास सुरुवात केली आहे.

एनडीए मध्ये सहभागी असलेला सर्वात मोठा मित्र पक्ष शिवसेना आणि बिजू जनता दल यांनी अविश्वास दर्शक प्रस्तावात चर्चेवर आणि  मतदानवर  बहिष्कार टाकला आहे. शिवसेनाने टाकलेला बहिष्कार भाजपसाठी धक्कादायक आहे. शिवसेनेचे लोकसभेत 18 खासदार आहेत. तर शिवसेना आणि बिजू जनता दल यांचे एकूण 20 खासदार आहेत.

आम आदमी पार्टी ने देखील आपल्या खासदारांना मोदी सरकार विरोधात वोट करण्यात यावा असा व्हीप काढला आहे.

त्यामुळे लोकसभात आता 495 अशी स्थिती आहे. लोकसभात एकूण 545 जागा आहेत.

कॉंग्रेसला अविश्वासदर्शक प्रस्तावावर आपले मत मांडायला 38 मिनिट एवढा कालावधी मिळाला. यामुळे मालिकार्जुन खरगे यांनी कॉंग्रेसला बोलण्यासाठी कमी वेळ दिल्याचा प्रश्न उचलून धरला.

टीडीपीला अविश्वासदर्शक प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी 13 मिनिट एवढा अवधी दिला. आण्णा द्रमुकला 29 मिनिट, तृणमूल कॉंग्रेसला 27 मिनिट, बिजू जनता दलला 15 मिनिट, तेलंगणा राष्ट्र समितिला 9 मिनिट एवढा कालावधी देण्यात आला.   तर भाजपला संसदेत चर्चेसाठी 3 तास 33 मिनिट वेळ देण्यात आला.

कोणी कोणी दिले अविश्वासदर्शक प्रस्तावाला समर्थन- 

टीडीपी बरोबरच वायएसआर कॉंग्रेस ने देखील अविश्वासदर्शक प्रस्तावाला समर्थन दिले आहे. कॉंग्रेस, आप, तृणमूल कॉंग्रेस, एआयएडीएमआयके, एआयएमआयएम यांनी देखील अविश्वासदर्शक प्रस्तावाला समर्थन दिले आहे,  हे सरकारविरोधात मतदान करणार आहेत.

पक्षानुसार खासदारांची संख्या- 

सध्या एनडीएमध्ये लोकसभेत एकूण311 खासदार सदस्य आहेत. भाजपचे लोकसभेत 273 खासदार सदस्य आहेत. या प्रक्रियेत लोकसभा सभापती सुमित्रा महाजन देखील मतदान करणार असल्याने भाजप ची सभागृहातील सदस्य संख्या 274 वर जाते. शिवसेनेचे 18, शिरोमणी अकाली दल चे 6 आहेत.

तर विरोधी पक्षांच्या खासदार सदस्यांची संख्या 222 एवढी आहे.  यात कॉंग्रेसचे 48, आण्णा द्रमुक चे 37, तृणमूल कॉंग्रेस 34, बिजू जनता दल 20,     तेलगू देसम  पार्टी  16 तर टीआरएस 11 असे खासदार सदस्य आहेत.

Loading...

काय असतो अविश्वास प्रस्ताव? मोदी सरकारवर याचा किती परिणाम होईल? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Previous article

पहा व्हिडिओ : …. आणि राहुल गांधीनी लोकसभेत पंतप्रधान मोदींना दिली ‘जादू की झप्पी’

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *