मुख्य बातम्या

मराठा आरक्षणासाठी मुंबईचे डबेवाले संभाजीराजेंच्या भेटीला,म्हणाले..

0

मराठा आरक्षणासाठी राज्यात आंदोलनाला वेगळं वळण मिळालेलं असतानाच आता यामध्ये मुंबईच्या डबेवाल्यांनीही आता महत्त्वाची भूमिका बजावण्याचा निर्णय घेतला आहे. तसा निर्णयच त्यांनी थेट खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्याशी भेट घेऊन सांगितला आहे.
सध्या सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मराठा आरक्षण मिळावं यासाठी मोठं जन आंदोलन करावं लागणार आहे. तसंच कायदेशीर मार्गानंही लढण्यासाठी एकत्र यावं लागणार आहे, असं म्हणत या आंदोलनासाठी कणखर नेतृत्वाची गरज आहे असल्याचं सांगत मुंबई डबेवाहतुक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार संभाजीराजे यांची भेट घेतली. यावेळी मराठा समाजाच्या आंदोलनाचं नेतृत्व त्यांनी स्वीकारावं अशी मागणीवजा विनंतीही त्यांनी केली.
जवळपास १३० वर्षे जुन्या अशा एकमेव मराठमोळ्या मुंबई जेवण डबेवाहतुक मंडळाचे रामदास करवंदे, विनोद शेटे, जयसिंग पिंगळे यांनी रायगड येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय सर्वांसमक्ष ठेवला.
महत्वाच्या बातम्या :-

राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला कोरोनाची लागण ; वरिष्ठ नेत्यांसोबत घेतली होती बैठक
मोठी बातमी : “सगळेच आरक्षण रद्द करा आणि….” ; उदयनराजेंच खळबळजनक वक्तव्य
तिजोरीत खळखळाट झाल्याने नागपूरला 500 कोटींचे विशेष अनुदान द्या ; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
ड्रग्स प्रकरणाचा तपास सुरू असतानाच NCBचे प्रमुख दिल्लीला रवाना !
भाजपने बदनामी केली मग त्यांच्यासोबत परत कशाला जायचे ; राऊत-फडणवीस भेटीमुळे सेनेत नाराजीचे सूर

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मराठा आरक्षणासाठी मुंबईचे डबेवाले संभाजीराजेंच्या भेटीला,म्हणाले.. InShorts Marathi.

येत्या 1 ऑक्टोबरपासून ‘या’ बदललेल्या नियमांचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार !

Previous article

या ५ अभिनेत्री आहेत सर्वात श्रीमंत व्यावसायिकांच्या पत्नी, नंबर ५ वाली तर आहे १९८८० करोडची मालकीण !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.