Royal Entertainmentमुख्य बातम्या

पुण्यातील सांस्कृतिक दालने खुली

0

पुणे -राज्यापाठोपाठ महापालिकेनेही पुण्यातील सिनेमागृहे, नाट्यगृहे, योगासन वर्ग खुले करण्यास सशर्त परवानगी दिली. परंतु, राज्याने जलतरण केंद्रांना (स्वीमिंग पूल) परवानगी दिली असली तरीदेखील पुणे महापालिकेने मात्र जलतरण केंद्र अद्यापही बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला.
योगासन वर्गांनी फिजिकल डिस्टन्सिंगसह अन्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे. परिणामी पुणेकरांना आता मनोरंजनाबरोबरच व्यायामप्रकारही करता येणार असून करोनामुळे आलेली मरगळ व दुःखाचे मळभ दूर होण्यास मदत होईल.
महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांनी याबाबतचा आदेश गुरुवारी (दि. 5) रात्री काढला. मायक्रो कन्टेन्मेंट झोनबाहेरील सिनेमाहॉल, मल्टिप्लेक्‍स, नाट्यगृह 50 टक्‍के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून खाद्यपदार्थ विक्रीस मात्र बंदी घालण्यात आली आहे.
तसेच नागरिकांनाही बाहेरील पदार्थ सोबत नेण्यास मज्जाव घातला आहे. बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इन्डोअर शूटिंग रेंज या खेळांनाही गुरुवारपासून सशर्त परवानगी देण्यात आली.
उल्लंघन केल्यास कारवाई
करोना पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय दंडसंहितेच्या कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले. नाट्यगृह, सिनेमागृहांनी आपापल्या जबाबदारीचे भान राखत करोनाचा प्रसार होणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
The post पुण्यातील सांस्कृतिक दालने खुली appeared first on Dainik Prabhat.

मुतखड्याचा त्रासापासून हैराण असाल तर करा हे घरगुती उपाय.. पुन्हा कसलाच त्रास होणार नाही..!

Previous article

सतत उभे राहिल्याने महिलांना होऊ शकतो हा धोकादायक आजार. जाणून घ्या कुठला आहे तो..

Next article

You may also like

Comments

Comments are closed.