Royal EntertainmentRoyal politicsट्रेंडिंगभारतमहाराष्ट्रमुख्य बातम्या

मुळशी पॅटर्न सिनेमात कुख्यात गुन्हेगारांना घेऊन चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड

0

मुळशीच्या गुन्हेगारीवर आधारित असलेल्या मुळशी पॅटर्न या सिनेमातील टीजर प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपट प्रेमींनीही या टीजरला पसंती नोंदवली होती. पण आता एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सिनेमात मुळशीतल्या कुख्यात गुन्हेगारांना घेऊन चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.

खुनासारखे गंभीर गुन्हे असलेल्या टोळ्या चालवणाऱ्या गुंडांना घेऊन टीजर चित्रित झाल्याचं उघड झालं आहे. टीजरमध्ये विठ्ठल शेलार आणि अमोल शिंदे हे दोन कुख्यात गुन्हेगार दिसत आहेत.

Loading...

अमोल शिंदे हा मोक्काचा आरोपी आहे, त्याच्यावर खून,दरोडा,घातक शस्त्र बाळगण्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडांचं अपहरण करून खून करून त्यांचे मृतदेह जाळल्याचे गुन्हा विठ्ठल शेलार याच्यावर दाखल आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मात्र विठ्ठल शेलार आणि अमोल शिंदे याच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत, हे मला माहित नसल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. मुळशीच्या गुन्हेगारीवर आधारित सिनेमा बनवणऱ्या दिग्दर्शकाला याबद्दल माहित नसेल म्हणजे नवलच असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकाकडून येत आहे. सिनेमामध्ये या गुन्हेगारांना घेऊन प्रवीण तरडे यांना नेमकं काय साधायचंय असा प्रश्न विचारला जातोय.

मुळशी तालुक्याच्या गुन्हेगारी टोळ्या या संपूर्ण शहर आणि जिल्ह्यात दहशत पसरवत असताना या गुंडांना चित्रपटात घेऊन उदात्तीकरण करणाचा प्रयन्त्न तर नाही ना? असा सवाल उपस्थित होतो आहे.

Loading...

गौतम नवलखांच्या सुटकेला राज्य सरकारचे सुप्रीम कोर्टात आव्हान

Previous article

सलमान खान आणि प्रियंका चोप्रा ठरले बॉलीवूडचे ‘ट्रेंडसेटर’ !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.