खेळमहाराष्ट्रमुख्य बातम्या

क्रिकेटपटू श्रीशांतच्या कोचीमधील घरात आग

0

क्रिकेटपटू श्रीशांतच्या कोचीमधील घरात आग लागल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत घरातील एक खोली जळून खाक झाली. सुदैवाने या आगीतून त्याचे कुटुंबीय बालंबाल बचावले आहेत.

शेजाऱ्यांनी धूर पाहून अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी पहिल्या मजल्यावरील काचेचे दरवाजे तोडून कुटुंबीयांची सुटका केली. सुदैवाने घरातील कोणालाही इजा झालेली नाही. आगीत एक बेडरुम जळून खाक झाल्याची माहिती आहे.आग लागली त्यावेळी श्रीशांत घरात नव्हता. आगीच्या घटनेविषयी समजल्यावर त्याचाही भीतीने थरकाप उडाला. मात्र कुटुंबीयांची खुशाली समजल्यावर त्याचा जीव भांड्यात पडला.

Loading...

कोचीमध्ये असलेल्या श्रीशांतच्या घराच्या तळ मजल्यावर आगीचा भडका उडाला. त्यावेळी श्रीशांतची पत्नी, त्याची मुलं आणि घरातील दोन नोकर पहिल्या मजल्यावर होते. मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्यामुळे कोणाला समजण्याआधीच ती तळ मजल्यावरील हॉल आणि बेडरुममध्ये पसरली.

 

 

Loading...

आम्हाला सत्ता द्या 6 महिन्यात शेतकर्‍यांचा 7/12 कोरा करू- अजित पवार

Previous article

दल आणि नक्षल्यांमध्ये चकमक, पाच नक्षलवाद्यांचा खात्मा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.

More in खेळ