मुख्य बातम्या

24 तासांत पुण्यात सापडले कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक रुग्ण , पहा आकडेवारी

0

महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान सुरूच आहे. काल गुरुवारी कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येनं नवा विक्रम केला. एकट्या पुणे शहरात 2969 नवे रुग्ण सापडले. पिंपरी चिंचवड परिसरात 1168 नवे रुग्ण सापडले. त्याखालोखाल मुंबई आणि ठाण्यात रुग्णवाढीने कहर केला आहे. राज्यात 10 सप्टेंबरच्या सरकारी आकडेवारीनुसार 23,446 नवे रुग्ण 24 तासांत दाखल झाले आहेत.
कोरोना साथीने कळस गाठलाय हेही स्पष्ट होत नाही. कारण नवी रुग्णसंख्या कमी व्हायचं नाव घेत नाही. बरे होणारे रुग्ण आणि नव्याने दाखल होणारे रुग्ण यातलं अंतर वाढल्यामुळे चिंता वाढली आहे.
गेल्या 24 तासांमध्ये राज्यात एकूण 23,446 नवे रूग्ण आढळलेत. तर दिवसभरात 14,253 रूग्ण बरे झाले आहेत. 448 जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंतच दिवसभरातली ही सर्वात जास्त संख्या आहे. राज्यातल्या रूग्णाची एकूण संख्या ही 9,90,795 एवढी झाली आहे.

पुणे शहरात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या १६ हजार ७१७ !
पुणे शहरात कोरोनाबाधितांची एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या १६ हजार ७१२ झाली आहे. त्यात हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे ६ हजार ९१५ रुग्ण असून होम आयसोलेशनमध्ये ९ हजार ७९७ रुग्ण उपचार घेत आहेत.#PMCFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) September 10, 2020

महत्वाच्या बातम्या :-

इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला
दहा-पंधरा वर्षांपूर्वी वर आलेले आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत ; खडसेंचा फडणविसांवर हल्ला
मोदींना जाब विचारण्याची हिंमत आहे का? मुख्यमंत्र्यांचा भाजपला खडा सवाल

राज्यातील मंदिरे उघडण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात…
पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांचे पंचनामे करुन तातडीने मदत द्या ; फडणवीसांची सरकारकडे मागणी

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. 24 तासांत पुण्यात सापडले कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक रुग्ण , पहा आकडेवारी InShorts Marathi.

शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !

Previous article

“अब मे चल पडा मेरे राह की और…” , भावुक होऊन तुकाराम मुंढेंनी घेतला नागपूरकरांचा निरोप

Next article

You may also like

Comments

Comments are closed.