मुख्य बातम्या

कोरोनाचा कहर ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू !!

0

बुलढाणा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात आयोजित बैठकीदरम्यान पालकमंत्री शिंगणे यांनी दिल्या.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाच हजाराच्यावर गेली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात जनता कर्फ्यू घोषित करण्यात यावा, अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी, संघटना यांनी केली होती. त्यानुसार जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, जनता कर्फ्यूत दूध डेअरी, मेडिकल, हॉस्पिटल, पेट्रोल पंप, बँक व शासकीय कार्यालय वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, हॉटेल्स, आस्थापना बंद ठेवण्यात याव्या असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या :-

कोल्हापुरात तूर्तास कडक लॉकडाऊन करणार नाही – पालकमंत्री सतेज पाटील
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे ‘या’ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून पुन्हा लॉकडाऊनची मागणी
पुण्यात मास्क न घालणाऱ्यांकडून वसूल केला तब्बल 25 लाख रुपयांचा दंड
मुंबईत येत्या काही आठवड्यांमध्ये भयंकर पसरेल कोरोना !
लोकसभेच्या 17 खासदारांना कोरोनाची लागण ; भाजपाचे डझनभर तर एक शिवसेनेचा नेता बाधित

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कोरोनाचा कहर ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू !! InShorts Marathi.

आम्ही उगाचच 30 वर्ष शिवसेनेच्या प्रेमात पडलो ; शहराच्या नामांतरावरुन औरंगाबादकरांच्या प्रतिक्रिया

Previous article

अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय ! लोकलच्या १५० फेऱ्या वाढवल्या !!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.