मुख्य बातम्या

मुंबईत येत्या काही आठवड्यांमध्ये भयंकर पसरेल कोरोना !

0

मुंबईकरांची चिंता वाढवणारी माहिती महानगरपालिकेतून समोर आली आहे. राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असताना मुंबईतही रोज कोरोनाचे नवे रुग्ण समोर येत आहेत. अशात बीएमसीच्या वरिष्ठ सूत्रांनी कोरोनासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढील 3 ते 4 आठवड्यांमध्ये दररोज 2000 हून अधिक कोरोना प्रकरणं समोर येण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकरांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे मोठ्या संख्येनं रोज कोरोना रुग्णांची नोंद होत असली तरी मुंबईतील वाढती संख्या ही कोरोनाची दुसरी लाट नाही असं पालिकेचं म्हणणं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची संख्या 3-4 आठवड्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यानंतर आकडा कमी होत जाईल. सध्या शहरात रोज सुमारे 16,000 चाचण्या घेतल्या जातात. यात जलद चाचण्या आणि RT PCR चाचण्यांचाही समावेश आहे. मुंबईत आरटी पीसीआर चाचणी क्षमतेचा पुरेपूर उपयोग केला जात आहे असं पालिकेनं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

चिंतेत वाढ करणारी बातमी ; देशात कोरोना रुग्णांची संख्या ४५ लाखांवर !
“उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये नाहीतर…” अयोध्येतील संतांकडून मुख्यमंत्र्यांना धमकी
संजय राऊतांनी मला उघड धमकी दिलीय ; कंगनाचा गंभीर आरोप
सूड बुद्धीने ठाकरे सरकार कंगनावर कारवाई करत आहे का ?
धनंजय मुंडेंनी घेतला कंगनाच्या वक्तव्याचा समाचार , म्हणतात..

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मुंबईत येत्या काही आठवड्यांमध्ये भयंकर पसरेल कोरोना ! InShorts Marathi.

काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल ; गुलामनबी, खरगे यांना महासचिव पदावरून हटवले !

Previous article

विकेण्डला कोरोनाची रेकॉर्डब्रेक वाढ ; 24 तासांत समोर आली धक्कादायक आकडेवारी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.