मुख्य बातम्या

कोरोना चाचणीचे दर आणखी कमी करणार ; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा

0

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना, कोरोना चाचणीचे दर कमी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. कोविड टेस्टचे दर बाराशे रुपयांपर्यंत आणण्यात येणार असून त्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. टोपेंनी बुधवारी जनता दरबार घेतला. यावेळी ते बोलत होते. ग्रामीण भागात पसरत चाललेला कोरोना चिंतेचा विषय आहे. श्रीमंत लोक आयसीयू बेड्स अडवून ठेवत असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
पुण्यातील रिपोर्टर मृत्यू प्रकरणी बोलताना, अ‍ॅम्ब्युलन्स न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू होतो ही बाब दुर्देवी असल्याचं ते म्हणाले. तसंच याबाबत चौकशी करु असा विश्वासही त्यांनी दिला आहे.
रुग्णांसाठी गरजेपेक्षा जास्त अ‍ॅम्ब्युलन्स सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागात कोरोना पसरतोय ही चिंतेची बाब आहे. बरेचसे लोक लक्षणं नसताना आयसीयूमध्ये अ‍ॅडमिट होतात. श्रीमंत लोक असं करतात त्यामुळे आयसीयू बेडची कमतरता भासत असल्याचं, टोपे म्हणाले.
कोरोना टेस्ट कमी केल्या असा कोणताही विषय नाही. एक व्यक्ती पॉझिटिव्ह आला, की त्याच्या संपर्कातील 20 लोकांचं ट्रेसिंग केलं जातं आहे. ICMRच्या गाईडलाईन्सच्या बाहेर राज्य सरकार काम करत नाही, काहीही लपवलं जात नसल्याचंही टोपेंनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :-
गणेश विसर्जन सोहळ्यानंतर पुणे पोलीसांनी मानले पुणेकरांचे आभार
मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे ‘या’ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून पुन्हा लॉकडाऊनची मागणी
शिरुरमधील धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
लवकरच शालेय शिक्षणात शेती विषयाचा समावेश करणार ; मोदीसरकारचा विचार सुरू
 
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कोरोना चाचणीचे दर आणखी कमी करणार ; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा InShorts Marathi.

तिच्या जाण्यानं उदयनराजे झाले हळवे , शेअर केली भावनिक पोस्ट

Previous article

बच्चन कुटुंबीयांमध्ये झाली नव्या पाहुणीची एंट्री

Next article

You may also like

Comments

Comments are closed.