मुख्य बातम्या

Corona Update : राज्याचे मुख्य सचिव संजय कुमारांना कोरोनाची बाधा

0

कोरोनाचा शिरकाव राज्याच्या मंत्रीमंडळात वेगाने होताना दिसतोय. दरम्यान आता राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. सध्या मुख्य सचिव घरीच क्वारंटाईन आहेत.मुख्य सचिव हे अनेक बैठकांना हजर असल्याने प्रशासनाची सध्या चिंता वाढली आहे.
मागील आठवड्यात मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला ते हजर होते. यापूर्वी अनेक प्रधान सचिव आणि सचिव दर्जाच्या अधिकार्‍यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
या पार्श्वभुमीवर मंत्रालयात आता विशेष काळजी घेतली जाण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना सौम्य लक्षण जाणवत असल्याने संजय कुमार यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली होती. सौम्य लक्षणे जाणवू लागल्यापासून ते स्वतः विलगीकरणात गेले होते. आज त्यांचा कोरोना अहवाल आला.
महत्वाच्या बातम्या :-
राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला कोरोनाची लागण ; वरिष्ठ नेत्यांसोबत घेतली होती बैठक
मोठी बातमी : “सगळेच आरक्षण रद्द करा आणि….” ; उदयनराजेंच खळबळजनक वक्तव्य
तिजोरीत खळखळाट झाल्याने नागपूरला 500 कोटींचे विशेष अनुदान द्या ; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
ड्रग्स प्रकरणाचा तपास सुरू असतानाच NCBचे प्रमुख दिल्लीला रवाना !
भाजपने बदनामी केली मग त्यांच्यासोबत परत कशाला जायचे ; राऊत-फडणवीस भेटीमुळे सेनेत नाराजीचे सूर
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. Corona Update : राज्याचे मुख्य सचिव संजय कुमारांना कोरोनाची बाधा InShorts Marathi.

राजकीय गोटात खळबळ ; शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजप-राष्ट्रवादी एकत्र?

Previous article

मोठी बातमी : विश्वास नांगरे पाटील यांची शरद पवारांसोबत बैठक ; भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या

Next article

You may also like

Comments

Comments are closed.