Royal politicsटॉप पोस्ट

2019 च्या लोकसभा निवडणुकीत हा पक्ष उभे करणार 543 महिला उमेदवार

0

एक असा पक्ष जो येणार्‍या 2019 च्या निवडणुकीसाठी आपल्या 543 जागांवर महिला उमेदवार उभे करणार आहे. तमिळनाडूमध्ये भ्रष्टाचार विरोधी डायनॅमिक पार्टी (Anti Coruption Dynamic Party)  या नवीन  स्थापन करण्यात आलेल्या पक्षाकडून ही आणोखी घोषणा करण्यात आली आहे.

“पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व 543 जागांसाठी महिला उमेदवारांची यादी तयार केली जाणार आहे. आपल्या राजकीय व्यवस्थेत स्त्रियांबरोबर भेदभाव केला जातो आणि  आमचा पक्ष ते बदलण्याचा प्रयत्न करेल” हे विधान आहे  उच्च न्यायालयचे सेवानिवृत्त न्यायाधीश सी एस कर्णन यांचे.

Loading...

सेवानिवृत्त न्यायाधीश सी एस कर्णन ह्यांनी तमिळनाडू मध्ये भ्रष्टाचार विरोधी डायनॅमिक पार्टी (Anti Coruption Dynamic Party) या पक्षाची स्थापना केली आहे. ” भ्रष्टाचार मुक्त सरकार आणण्याचे आपले ध्येय असल्याचे सांगत” त्यांनी बी. आर. आंबेडकर मेमोरिअल हाऊस, चेन्नई येथून आपल्या पक्ष स्थापनेची घोषणा केली.

कोण आहेत  सी एस कर्णन ?  

सी एस कर्णन यांना न्यायालयीन अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून मागील वर्षी सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात होती.      सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 12 मे ला फरार म्हणून घोषित केले होते.

सीआयडी ने 20 जून 2017  ला त्यांना  पश्चिम बंगाल (कोइंबतूर) येथून अटक  करण्यात आली होती. न्यायालयीन अवमान केल्याचे हे प्रकरण देशभरात गाजले होते.

देशातील भ्रष्टचारबाबतची स्थिती सुधारण्याची गरज आहे. देशातील सर्व संस्थांबरोबरच न्यायालयातील भ्रष्टाचार संपवण्यचा माझा पक्ष प्रयत्न करेल असे देखील सी एस कर्णन यांच्याकडून सांगण्यात आले.

Loading...

‘क्वांटिको’मध्ये दाखवण्यात आलेल्या हिंदू दहशतवादाच्या दृश्यांबद्दल एबीसी स्टुडिओकडून माफी

Previous article

भारत बनलाय या आंतरराष्ट्रीय संघटनेचा संपूर्ण सदस्य; पहिल्यांदाच सहभागी होणार या संघटनेच्या परिषदेत

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *