मुख्य बातम्या

‘काँग्रेस का हात दलालों के साथ’ ; कृषी विधेयकावरुन भाजपचा घणाघात

0

केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे, त्यांना त्यांच्या मालाचा दर ठरवण्याचे स्वातंत्र्य देणारे आहे. काँग्रेस त्याला विरोध करत असेल तर ते शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे असे दिसते. त्यांच्या कृषी विधेयकाला विरोध करण्याच्या भूमिकेमुळे ‘काँग्रेस का हात दलालोंके साथ’ असेच म्हणावे लागेल, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.
कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ उपाध्ये यांंनी माध्यम प्रतिनिधींबरोबर संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. उपाध्ये म्हणाले, काँग्रेस या विधेयकाच्या विरोधात अपप्रचार करत आहे. ते सत्तेवर होते त्यावेळी त्यांनी कधीही शेतकऱ्यांना नडणारी आडते, दलाल ही व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला नाही.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी त्यांनी लागू केल्या नाहीत, त्या भाजपाने केल्या. शेतकऱ्याला त्याच्या मालाचा दर ठरवण्याचा अधिकार हवा, तो कुठे, कोणाला, कसा विकायचा याची मुभा त्याला हवी. केंद्र सरकारने मंजूर केलेली तिन्ही विधेयके हेच करणारी आहेत असा दावा उपाध्ये यांंनी केला.
महत्वाच्या बातम्या :-

राजकीय खळबळ : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?
शरद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच ; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
“राज्याच्या हितासाठी मोदी सरकारशी भांडायची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही”
मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊत
महत्वाचे : राज्यातील हॉटेल सुरू करण्याबाबत आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘काँग्रेस का हात दलालों के साथ’ ; कृषी विधेयकावरुन भाजपचा घणाघात InShorts Marathi.

WHOचा धक्कादायक खुलासा ; कोरोनाला हरविण्यात लशीची गॅरेंटी नाही

Previous article

कोरोना संकट काळात शरद पवार मदतीला धावले ; केली ‘ही’ मोलाची मदत

Next article

You may also like

Comments

Comments are closed.