Royal politicsटॉप पोस्ट

इंधन भाववाढ :- कॉंग्रेसकडून व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदींची थट्टा, महागाई नियंत्रणात असल्याचा पंतप्रधानांचा दावा

0

पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडत असताना राजकीय वातावरण देखील भलतेच भडकले आहे. विरोधीपक्षाकडून रोज सरकारची पेट्रोल डिझेलच्या वाढणार्‍या भावामुळे वाभाडे काढले जात आहे. कॉंग्रेसकडून आज देखील एक व्यंगचित्र ट्वीटरवर ट्विट करण्यात आले. त्यात कॉंग्रेसकडून पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हे क्रिकेटच्या पिचवर पेट्रोल-डिझेल बरोबर क्रिकेट खेळत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

सत्ता की पिच पर नौसिखियों की भरमार हो गयी। तेल के बढ़ते दामों पर धराशायी सरकार हो गयी। असे ट्विट करीत कॉंग्रेसच्या ट्वीटर अकाऊंटवर #जन की बात हॅशटॅग वापरुन भाजपवर टीका करणारे व्यंगचित्र पोस्ट केले आहे. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर रोखण्यात भाजप अपयशी झाल्याचे यातून सांगण्यात आले आहे. पेट्रोल-डिझेल मोदींच्या बॉलवर फटाकेबाजी करण्यासाठी पिचवर उतरले आहे आणि स्कोरबोर्ड वर पेट्रोलने 90 आणि डिझेलने 80 पार केल्याचे दाखवण्यात आले आहे.

Loading...

मोदींकडून नो बॉल टाकण्यात येत असल्याचे दाखवण्यात आले आहे तर 56 ओवर चालू असल्याचे व्यंग करण्यात आले. तर टोटल 420 दाखवण्यात आली आहे. इंधन लवकरच 100 पार करणार असल्याचे दाखवले आहे.

इंधन भाव वाढले तरी महागाई नियंत्रणात-

असे असताना आज पंतप्रधान मोदींकडून कॉंग्रेस खोट खपवण्यासाठी निर्लज्ज झाले असल्याचा आरोप केला आहे. आज ते एका कार्यक्रमात भाजपच्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत होते.

पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले असले तरी भाजपने दररोजच्या जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवले नाहीत, महागाई नियंत्रणात ठेवली आहे असा दावा पंतप्रधान मोदींकडून करण्यात आला आहे.  कॉंग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, कॉंग्रेसच्या काळात महागाई 10 टक्यांवर होती, परंतु आमच्या काळात महागाई दराचा टक्का कमी होऊन 3-4 टक्यांवर आला.

गृह कर्जावर आधी 10 टक्के व्याज द्यावे लागत होते आता हे व्याज 8.5 टक्के इतके कमी झाले आहे. इतर कर्ज देखील स्वस्त झाली आहेत  आणि महत्वाचं म्हणजे मोबाइल डेटा देखील स्वस्त झाला आहे असे देखील त्यांनी नमूद केले.


फेसबूक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आम्हाला नक्की फाॅलो करा. तसेच व्हाॅट्सअॅपवर बातम्या मिळवण्यासाठी +91 9146424919 या नंबरवर ‘Join’ आणि ‘तुमचे नाव’ असा मेसेज नक्की करा.

नक्की वाचा- 

या कारणामुळे अॅपलच्या सेल्स मॅनेजरला पोलीस कॉंस्टेबलने मारली गोळी, मॅनेजरचा मृत्यू

 

Loading...

या कारणामुळे अॅपलच्या सेल्स मॅनेजरला पोलीस कॉंस्टेबलने मारली गोळी, मॅनेजरचा मृत्यू

Previous article

जर पेट्रोलने शंभरी पार केली तर पेट्रोल पंप होतील बंद?

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *