Royal politicsटॉप पोस्ट

विहिरीत अंघोळीसाठी उतरल्याबद्दल तीन लहान मुलांना क्रूर मारहाण; महाराष्ट्रासाठी लज्यास्पत घटना

0

महाराष्ट्र (जळगाव):- 

गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यात दलितांवर अत्याचार होत असल्याच्या बर्‍याच घटना महाराष्ट्रातील लोक ऐकतात आणि वाचतात. परंतू आता महाराष्ट्र सारख्या पुरोगामी म्हणवणार्‍या राज्यात देखील अशा घटना समोर येत आहेत ज्यात समजातील दुर्बल घटकांवर अत्याचार केले जातात.

Loading...

10 जून (रविवार) घडलेली घटना आता समाज माध्यमांवर वायरल होत आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील वाकडी गावात  3 लहान दलित मुलांवर अत्याचार करून, मारहाण करून, त्यांना नग्न करून त्यांची गावात धिंड काढल्याची घटना समोर आली आहे.

कडक ऊन असल्याने या तीन लहान मुलांनी वाकडी गावात असलेल्या एका विहरीत अंघोळीसाठी उतरले. ही घटना गावातील काही आजूबाजूच्या लोकांना कळताच त्यांनी त्या लहान मुलांना विहिरी बाहेर  यायला सांगून त्यांना नग्न केले, येवढेच नाही तर नग्न करून त्यांना मारहाण केली,

समाजमाध्यमावर वायरल होणार्‍या या विडियोमध्ये असे दिसते आहे की या लहान मुलांना नग्न करण्यात आले आहे. ती मुले स्वत: ला झाडाच्या पानांनी झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. एक क्रूर माणूस या लहान मुलांना पट्याने आणि लाकडी दंडयाने मारहाण करीत आहे आणि ही मुले पुन्हा असे करणार नाही, या वेळी सोडा अशा विनवण्या करीत आहे.

महाराष्ट्रासारख्या समाजसुधारक लाभलेल्या या राज्याला ही क्रूरतेचा कळस गाठणारी घटना लज्यास्पत असल्याची चर्चा समाजमध्यमावर  सुरू झाली आहे. घटनेच्या काही दिवसानंतर हा व्हिडिओ वायरल झाला आहे.

राहुल गांधी यांनी या क्रूर घटनेबद्दल ट्विट केले आहे. 

राहुल गांधी यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या बद्दल ते म्हणतात की, “या तीन मुलांची चूक इतकीच होती की ते उच्च वर्गीय म्हणवल्या जाणार्‍या च्या विहिरीत उतरून त्यांनी आंघोळ केली. मानवता देखील शेवटच्या आशेच्या आधारावर आपली अस्मिता वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजप / आरएसएस च्या या मनुवादी विषारी द्वेषाच्या राजकरणाविरुद्ध आपण आवाज उठवला नाही तर इतिहास आपल्याला कधी माफ करणार नाही.”

https://twitter.com/RahulGandhi/status/1007519009158332416

राज्यात होणार्‍या पीडितांच्या आरोपींना भाजप संरक्षण देत असल्याचा आरोप कॉग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. हा व्हिडिओ वायरल झालेल्या नंतर आणि मारहाण करणारे उच्च वर्गीय असल्याचे समजल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 

महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्र्यांनी या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. व  यात 2 आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे.

वर देण्यात आलेला व्हिडिओ हा फक्त वाचकांपर्यंत घटनेची माहिती पोहचावी यासाठी देण्यात आला आहे. समाजामध्ये भेद आणि तेढ निर्माण करणे हा आमचा हेतू नाही. समजातील अशा घटना थांबाव्यात यासाठी आमची, तुम्ही प्रयत्न करायला हवेत. 

Loading...

Race 3 Movie Review:- नुसतीच धावाधाव, स्टंट आणि गाड्यांची जाळपोळ

Previous article

Gold Teaser:- अक्षयकुमारच्या ‘गोल्ड’चा नवीन टीझर तुमच्या मध्ये देशभक्तीची भावना निर्माण करेल

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *