Royal politicsमुख्य बातम्या

छत्तीसगड – अटल बिहारी वाजपेयी यांची भाची भाजप विरोधात मैदानात, मुख्यमंत्र्यांविरोधात लढणार निवडणूक

0

काँग्रेसने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भाची करुणा शुक्ला यांना छत्तीसगडमधून उमेदवारी दिली आहे. त्या छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याविरोधात राजनांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढवतात.

छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुका 2 टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात 12 नोव्हेंबर 18 जागांसाठी आणि दुसर्‍या टप्प्यात 20 नोव्हेंबरला 72 जागांसाठी मतदान होईल. पहिल्या टप्प्यासाठी 23 तारखेला उमेदवार यादी जाहीर करण्याची शेवटची तारीख आहे. छत्तीसगड विधानसभेतून 90 जागांसाठी मतदान होणार आहे.

Loading...

कॉंग्रेसकडून पहिल्या टप्प्यासाठीची उमेदवार यादी काल जाहीर केली, रमण सिंह राजनांदगांव मतदारसंघातून निवडणूक लढवतात, परंतू यावेळी मात्र कॉंग्रेसकडून उमेदवारी दिलेल्या करुणा शुक्ला यांचे रमण सिंह यांच्या पुढे आवाहन असेल.

कोण आहेत करुणा शुक्ला – 

करुणा शुक्ला1993 मध्ये पहिल्यांदा भाजपच्या तिकीटावर बलोदापूरमधून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

भाजप केंद्रात सत्तेत आल्यानंतर 4-5 वर्षांपासून त्या सतत भाजप नेतृत्त्व आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्यावर टीका करत आहेत.

त्यानंतर पक्षांतर्गत नाराजी आणि पक्षाचे दुर्लक्ष या कारणाने त्यांनी 2014 सालीच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कॉंग्रेसकडून त्यांना लोकसभा निवडणुकीवेळी बिलासपुर येथून उमेदवारी दिली होती, पण त्यात त्यांना अपयश आले.

काँग्रेसकडून पहिल्या टप्प्यातील 18 जागांपैकी 12 जागांवरील उमेदवारांची यादी याआधीच जाहीर करण्यात आली होती. आता उरलेल्या 6 उमेदवारांची जाहीर काँग्रेसकडून काल जाहीर करण्यात आली आहे.

कॉंग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत राजनांदगावमधून करुणा शुक्ला, खैरागडमधून गिरवर जंघेल, खुज्जीमधून चन्नी साहू, मानपूरमधून इंद्र शाह मंडावी, डोंगरगावमधून दिलेश्वर साहू, डोंगरगडमधून भुवनेश्वर सिंह बघेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


हे ही वाचा – 

माझा पक्ष आणि पक्षप्रमुख बैलगाडा संघटनांच्या मागे ठामपणे उभे :- खा.शिवाजीराव आढळराव पाटील


 

Loading...

माझा पक्ष आणि पक्षप्रमुख बैलगाडा संघटनांच्या मागे ठामपणे उभे :- खा.शिवाजीराव आढळराव पाटील

Previous article

VIDEO- राज्यात एकच चर्चा अमृता फडणवीसांच्या सेल्फीची

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *