Royal politicsटॉप पोस्ट

Oops! पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काॅंग्रेसकडून झाली मोठी चूक

0

ट्विटरवरून भाजपवर नेहमीच टीका करणारी काॅंग्रेस पार्टी स्वतःच केलेल्या चुकीच्या ट्विटवर ट्रोल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काॅंग्रेसकडून आज चूक झाली. पंतप्रधानावर टीका करताना पक्षाच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांच्या एेवजी एका ट्विटमध्ये चुकीने प्रियांका चोप्रालाच टॅग केले गेले.

नंतर काॅंग्रेस पार्टीने ते ट्विट डिलिट केले. या ट्विटमध्ये पंतप्रधान माती परिक्षण केंद्राविषयी पंतप्रधान खोटे बोलत असल्याचे लिहिले होते. हे केंद्र माती विषयी शेतकऱ्यांना माहिती देते.

Loading...

‘पंतप्रधान मोदी हे माती परिक्षण केंद्राविषयी खोटे बोलत आहे. युपीए सरकारच्या काळात 1141 माती परिक्षण केंद्र होती –  @प्रियांका चोप्रा’ असे ट्विट पार्टी कडून करण्यात आले होते.

पंतप्रधान मोदींनी शेतकरी प्रश्नावरून काॅंग्रसवर टीका केल्यानंतर हे ट्विट करण्यात आले होते.

प्रियांका चतुर्वेदी या काॅंग्रेस पार्टीच्या प्रवक्त्या आहेत. त्या अनेक टिव्ही चॅनेलमध्ये भाग घेत असतात.

 

Loading...

आता तुम्ही बिनधास्त मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेऊ शकतात, राज्य सरकारची घोषणा

Previous article

मराठी माध्यमाच्या 6 वी च्या पुस्तकात गुजरातीचे धडे? महाराष्ट्र सरकारचा गुजराती कारभार

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *