टॉप पोस्ट

COLUMN: तू ही योगी, मी ही योगी

0
विकास काका ३६०

महाराष्ट्राच्या उत्तरेच्या राज्यात म्हणे एक योगी खूपच अडून बसला होता. सहकार्य करायला तयारच नव्हता हो.. कोणाला? तर दुसर्‍या योगीलाच, अहो खरंच! विश्वास नाही बसतं? तर ऐक…

यमुनेच्या तीरी काल पहिला हरि या गाण्याची आठवण झाली हो आम्हाला. असो. यमुना द्रुतगती मार्गाच्या तीरावर चार इत जमीन हवी होती हो आपला ‘शुद्ध घी’चा प्रकल्प उभारण्यासाठी. म्हणे ६ हजार कोटीचा एकदम शुद्ध प्रकल्प उभारणार आहेत तिथं योगी बाबा. पण बाबांना या ४२५ हेक्टर जमिनीमध्ये लालफित आड येतीये. विशेषच आहे म्हणा हे! आजपर्यंत बाबांना कोणी त्यांच्या इलाक्यात कधी विरोध केला नाही. लालफितीच्याच पायघड्या घातल्यात त्यांच्या शुद्ध चरणाला घी लावून. म्हणे त्यांच्या चरणांचा स्पर्श होताच त्या राज्याला रोजगार लाभतो. खरं की खोटं हे त्यांनाच माहीत.

Loading...

पण बाबा नाराज झाले. खूप प्रचार प्रसार केला हो त्यांनी कमळ फुलवायला. पण आता त्यांचा शुद्ध प्रकल्प उभारायला अडचण आल्याने ते नाराज झाले होते. बरोबरच आहे म्हणा, एक योगी ने दुसरे योगी को अब दीक्षा देने का बगत आ गया था; आणि त्यांची कागदपत्र पूर्ण नाहीत म्हणून रोखला प्रकल्प. मग जाणार कोणाकडे, कहा से देंगे स्वदेशी का नारा? स्वदेशी सिमकार्ड, स्वदेशी पॅंट, शुद्ध देसी गाय का घी, सर्वात नाईस पतंजली राईस, शुद्ध आलोवेरा जेल हमारे भूमी से बनाएंगे तो यहा का धन बाहर नही जाएगा असा विचार करतायेत योगी बाबा.

या शुद्ध प्रकल्पातून प्रत्येक वर्षी २५ हजार कोटी फूड प्रोसेसिंग होणारे म्हणे. १० हजार थेट रोजगार मिळणारे हो. मग बहुतेक आमचे शेतकरी संपावर उतरणार नाही? फायदा कोणाचा होणार? सबका विकास या सिर्फ एक का? होगा, तो साफ नियत से सही विकास होगा? आता ते ही त्या योगीनाच माहीत.

पण या उत्तरेच्या योगिनी म्हणे मनधरणी केली दुसर्‍या योगीची; आणि आदेशच सोडलेत हो शुद्ध देशी प्रकल्पाच्या परवानगीला वेग देण्याचे.. आता पुन्हा हे देखील योगी बाबांसाठी पायघड्या घालतील मख्खन मारके.. शेवटी देश का धन देश मे रहने का सवाल है… मग उगाच का पतंजलीचे आचार्य बाळ कृष्णजीं फोर्ब्सच्या यादीत मागच्या वर्षी ४८ व्या स्थानावर होते?

(PHOTO INPUT:- FACBOOK/ RAMDEV BABA)

Loading...

WORLD OCEAN DAY : प्लॅस्टिक प्रदूषण रोखण्याचे आवाहन

Previous article

वाह रे बिहार बोर्ड ! विद्यार्थ्याला दिले 35 पैकी 38 मार्क

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *