टॉप पोस्ट

Column : करामती ‘मोदी अॅंड सन्स’

0

विकास काका ३६०

म्हणे भारत वसाहतवादला खतपाणी घालतोय. काय सांगता राव? असं तुम्ही नक्कीच म्हणाल. नाही हो, हे काही खरं नाही. पण आपल्यावर जवळपास 200 वर्ष राज्य करून गेलेल्या इंग्लंडकडून हा दावा व्हायचा हो उगाच या लोकशाही असलेल्या देशावर. पण एवढं काय झालं असं म्हणाल ना तुम्ही.

अहो, आपल्या देशाचे माननीय महोदय (महोदय कसले, हे तर पळकुटे), जगभर चर्चित व्यक्ती श्री श्री नीरव मोदी, श्री श्री ललित मोदी आणि आपले किंगफिशरचे करते धरते विजय माल्या सध्या तिकडेच आपला तंबू ठोकून आहे ना. ‘लंडन’कर म्हणे, आमच्या बँकांना घर घर लावण्यासाठी आणि देशाची अर्थव्यवस्था मातीमोल करण्यासाठी मोदी 1, मोदी 2 आणि मल्याजी यांना भारताने इथं पाठवला आहे.

Loading...

अबबब, नाही हो ‘लंडन’कर. हे असा पाप आमचे सहिष्णू, राष्ट्रवादाचे कैवारी असलेले हे तिघं नाही करणार हो. तेच खरे भारतीय आहेत. ते फक्त भारतालाच चुना लावणार. आणखी एक; भारत सरकारने नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द केलेला आहे म्हणे. तरी हे महाशय अमेरिका, हाँगकाँग, सिंगापूरच्या वाऱ्या करतायेत. नशीबवान भारतीय आहेत राव. पण मनात पाल चुकचुकते हे ऐकल्यावर. फेब्रुवारीमध्ये मोदी सरकारने देशवासीयांसमोर राजधानी दिल्ली येथे नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द झाल्याची धडधडीत घोषणा केलेली. आता पासपोर्ट म्हणजे काय तर पारपत्र. जे एखाद्या देशाची सीमा ओलांडण्यासाठी लागतं.

आता माशी इथं शिंकते…नीरव मोदी हा तीन देश फिरून आला. मग या तीनही देशातील विमानतळ अधिकार्यांनी तुमचं पारपत्र रद्द झालं आहे असं म्हणून त्याला आडवल कसं नाही? का त्यांना त्याचा पासपोर्ट रद्द झालेल्याचे भारत सरकारचे आदेशच मिळाले नाही? की त्यांनी सरास त्याकडे दुर्लक्ष केले?

अजून एक. नीरव मोदी हा परदेश वाऱ्या काही उगाच करत नाही बरं का, तो त्या देशाच्या नागरिकात्वासाठी विचारणा करतोय. म्हणजे झालं. एकदा का दुसऱ्या देशाचा तो नागरिक झाला की, मग अवघड होऊन बसेल. कारण इतर देशाच्या नागरिकांना अटक करणं म्हणजे मोठा लालफितीचा कारभार.

आधीच आपली अर्थव्यवस्था वाऱ्याच्या वेगाने धावतीये. त्यात हे मोदी 1, मोदी 2 आणि मल्याजी यांचे कारनामे.

Loading...

Gold Teaser:- अक्षयकुमारच्या ‘गोल्ड’चा नवीन टीझर तुमच्या मध्ये देशभक्तीची भावना निर्माण करेल

Previous article

1992 ते 2018 मध्ये भारतात 47 पत्रकारांची हत्या, तर जम्मू -काश्मीरमध्ये 19 पत्रकारांची हत्या

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *